वडगाव वळणमार्गावर अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला

गुढिपाडव्याला सकाळी १० च्या सुमारास घटना उघडकीस

बहुगुणी डेस्क, वणी: रविवार म्हणजे गुढिपाडवा. सर्वजण मराठी नवीन वर्षाच्या स्वागतात लागलेले. तोच एक बातमी समोर येते. यवतमाळ बायपास मार्गावरील वडगाव वळण रस्त्याजवळ एका वृद्धाचा मृतदेह आढळला. तो मृतदेह तिथल्या एका प्रवासी निवाऱ्यात होता. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळले नाही.

वरील मृतदेहाजवळ काठी पडलेली होती. अर्थात हा इसम काठीच्या सहाय्याने चालत असावा. चालताना संतुलन गेल्याने पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. या घटनेच्या वेळी जवळपास कुणी नसावे. अन्यथा या वृद्धाला मदत मिळाली असती. मृतकाजवळ वणी ते वांजरी एसटी प्रवासाचं तिकीट मिळालं. त्यामुळे सदर इसम जवळपासचाच रहिवासी असावा किंवा जवळपास कुणाला भेटायला जात असण्याची शक्यता आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचलेत. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतकची ओळख अद्याप पटली नाही. पोलीस मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढील तपास जमादार गजानन होडगीर करीत आहे.

Comments are closed.