लो.टी. महाविद्यालयात डॉ. प्रमोद येरणे यांचे व्याख्यान

टेस्ट ट्यूब बेबी टेक्नॉलॉजीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज सोमवारी दिनांक 18 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक महाविद्यालयात डॉ. प्रमोद येरणे (नागपूर) यांचे टेस्ट ट्यूब बेबी टेक्नॉलॉजी (IVF) यावर शिबिर घेण्यात आले. वनस्पतीशास्त्र विभाग व लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. प्रमोद येरणे यांनी Promise for Fertility या विषयावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे होते तर डॉ महेंद्र लोढा हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

शिबिरात डॉ. येरणे यांनी स्त्री-पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्याची कारणे, वंध्यत्व निवारण यावरील विविध तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. प्रमुख अतिथी डॉ महेंद्र लोढा यांनी वणी सारख्या ग्रामीण ठिकाणी आता वंध्यत्व निवारण केंद्र उपलब्ध आहे आणि यशस्वरीत्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली वंध्यत्व निवारण केले जात असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले. प्रा. डॉ. प्रसाद खानझोडे यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अशा प्रकारचे उद्बोधक कार्यक्रम होणे गरजेचे असून यापुढे ही असे कार्यक्रम घेऊ अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ रवींद्र मत्ते यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ अजय राजूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका दीपाली साठे मानले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विज्ञान शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.