पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुप्रसिद्ध जनरल फिजिशियन, मधूमेह व हृद्यरोगतज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडीया यांची आज रविवारी दिनांक 3 एप्रिल रोजी वणीत विशेष व्हिजिट राहणार आहे. शहरातील यवतमाळ रोड जवळील बाकडे पेट्रोल पम्प जवळील ट्रु केअर पॉलिक्लिनिक या हॉस्पिटलमध्ये ते डायबिटीज (मधूमेह), हृदयरोग, वात, दमा, यकृतरोग (किडणी), लकवा, संधीवात (आर्थरेटीस), तीव्र ऍसिडिटी इत्यादी विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करणार आहे. दुपारी 12 ते 3 वाजपर्यंत तर संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत या वेळेत रुग्णांना तपासणी करता येणार आहे. दर रविवारी डॉ. रोहीत चोरडिया यांची वणी व्हिजीट असते.
डॉ. रोहीत धनराज चोरडीया हे मुळचे वणीतील असून ते सध्या नागपूर येथील सुप्रसिद्ध लता मंगेशकर हॉस्पिटल व ट्रीट मी हॉस्पिटल येथे वैद्यकीय सेवा देतात. ते एमबीबीएस, एमडी मेडिसिन (फिजिशिअन) आहेत. विशेष म्हणजे त्यांना डायबेटिज या विषयावर फेलोशिप देखील मिळाली आहे. मधूमेह व हृद्यरोगतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे..
वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील रुग्णांना रविवारी दुपारी 12 ते 3 व संध्याकाळी 6 ते 9 यावेळेत तपासणी करता येणार आहे. 9822516016 या क्रमांकावर कॉल करून रुग्णांना नोंदणी करता येणार आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये ओपीडीच्या वेळेते भेट देऊनही नोंदणी करण्याची सुविधा आहे. आठवड्यातील इतर दिवशी रुग्णांना नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा व ट्रीट मी हॉस्पिटल अजनी येथे उपचार मिळू शकेल.
Comments are closed.