मार्कंडेय पोदार लर्न स्कूलमध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

13 ते 18 जून पर्यंत उन्हाळी शिबिर (Summer Camp) चे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: प्रतिष्ठित पोदार शिक्षण नेटवर्कचे उपक्रम मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणीमध्ये लवकरच शैक्षणिक वर्ष 2022-23 ला सुरुवात होणार आहे. शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु असून 4 जून रोजी पालक – शिक्षक परिचय सभेचे आयोजन करण्यात आले. शिक्षक पालक सभेत ऍडमिशन झालेल्या पाल्यांच्या पालकांच्या सल्ला घेऊन नवीन प्रस्ताव व शंका समाधान करण्यात आले. यावेळी शिक्षक व पालकांसह संस्थेचे संचालक व मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.

पर्यावरण दिन साजरा
5 जून विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालक, विध्यार्थी व शिक्षकांकडून पर्यावरण संरक्षणासाठी शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. लहानमुलांच्या मनात समाजसेवेची भावना जागृत व्हावी यासाठी विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम शाळेतर्फे राबवले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान विद्यालयाच्या प्रांगणा बाहेर पाणपोईचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

समर कॅम्पचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मार्कंडेय पोदार लर्न स्कूलतर्फे शाळेतच समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्प हा 13 जून ते 18 जून पर्यंत चालणार आहे. या कॅम्पमधमध्ये 3 ते 11 वर्षांच्या मुलांना प्रवेश घेता येणार आहे. सदर कॅम्प हा कॅम्प स, 8.30 त दु. 11 वाजेपर्यंत चालणार आहे. यात सेल्फ डिफेन्स, डान्स, स्केट, ऐरोबिक्स, झुंबा, कॅलिग्राफी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट, संगीत इत्यादी विषयांचा समावेश आहे.

समर कॅम्प बाबत अधिक माहितीसाठी इच्छुक पालकांना 8999467922, 9579994672, 7820805742 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Comments are closed.