शासनाचे गायींकडे दुर्लक्ष… उपचारासाठी ना ऍम्बुलन्स, ना प्रतिदिन अनुदान

गोशाळा चालकांचे विविध मागण्यांसाठी निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अपंग, अंध, आजारी, निराधार, म्हाता-या गायींचा सांभाळ गोशाळा करतात. मात्र सध्या गोशाळेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या गोशाळा चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जात आहे. तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात गोशाळांना सरकारचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे गोशाळेच्या समस्या तात्काळ सोडव्यावा, अशी मागणी श्री गुरु गणेश गोशाळे तर्फे करण्यात आली आहे. याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला पशु उपचारासाठी 80 अॅम्ब्युलन्स दिल्या आहेत. टोल फ्रि नं. 1962 वर मिळणाऱ्या सुविधा या अॅम्ब्युलन्सवरील ड्रायव्हर, डॉक्टर अभावी बंद आहेत. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यात गोशाळांना प्रती दिन प्रती गोवंश अनुदान दिले जाते. मात्र महाराष्ट्रातील गोशाळेला हे अनुदान दिले जात नाही. त्यामुळे गोशाळेच्या मागणीकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Comments are closed.