वणी नगर परिषदेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी ‘मटका’ किंग

वणीकरांमध्ये रंगली आहे खमंग चर्चा

0

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर परिषदेमध्ये नुकतेच पार पडलेल्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी सर्वानुमते वणीतील कुख्यात मटका किंगची निवड करण्यात आली आहे. सुभाष आवारी यांच्या अनुमोदनाने ही निवड केली गेली. यात अनेक सुज्ञ कर्मचाऱ्यांनी  नकारही दर्शविला. परंतु त्याकडे लक्ष न देता निर्णय घेण्यात आला. याबतीत आता वणीकर जनतेमध्ये खमंग चर्चा रंगत आहे.

अध्यक्ष पदावर येणार व्यक्ती हा सुशिक्षित तसंच नियम व कायद्याचा मान करणारा असावा अशी अपेक्षा असते. जेणे करून कर्मचाऱ्यांच्या काही  समस्या असल्यास त्या समस्या घेऊन यवतमाळ समाजकल्याण ऑफिस पर्यंत पोहचविणे व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून आणणे हे या अध्यक्षाचे काम असते. परंतु या पदावर आपल्या कार्याची जाणीव नसणार व अवैद्य व्यवसायामध्ये आपला नावलौकिक करणारा इसम आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

याअगोदर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदावर एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे त्या पौर्णिमा शिरभते होत्या. परंतु आता ज्या व्यक्ती इथं निवडून आल्या आहे. त्याची ओळख एक अवैध व्यवसायिक म्हणून आहे. त्यांच्या कार्याबाबत सर्व वणीकर जनता सुपरिचित आहे. त्याना या पदावर विराजमान करणे हा काही राजकीय डाव तर नसावा ना ? असा प्रश्न  सुज्ञ व्यक्तिद्वारा  विचारला जात आहे.

असे नाही की नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये सुशिक्षित नाहीत मग सदर व्यक्तीची निवड का करण्यात आली असावी यामागे नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे.सदर इसम हा खरच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवीनार की फक्त पदाचा मान घेण्यासाठी नियुक्ती करवून घेतली हे निश्चित होण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार.

काही जाणकारांच्या मते वणीतील नगर परिषदेचे काही नगरसेवक हे निवडणुकीच्या वेळी आपल्यावर केलेल्या उपकार फेडण्यासाठी तर ही निवड केली नसावी असे मत व्यक्त करीत आहे. आता तरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे भविष्य काय? हे बघणे आता शिल्लक आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत वणीत खमंग चर्चा रंगली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.