धक्कादायक: आईवडील शेतात जाताच अल्पवयीन मुलगी घरुन बेपत्ता

वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: आई वडील आणि भाऊ शेतात गेले असता घरी एकटी असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. दि. 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान मुलगी घरातुन निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

प्राप्त माहितीनुसार बेपत्ता झालेली 16 वर्षाची कुमारिका तालुक्यातील एका गावात आपल्या आईवडील व मोठ्या भावासोबत राहते. ती वणी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. नुकतेच 15 मार्च रोजी परीक्षा संपली म्हणून ती गावी परत आली होती. गुरुवारी 31 मार्च रोजी सकाळी मुलीचे आईवडील व भाऊ शेतात गेल्यामुळे ती घरी एकटीच होती. दुपारी आई घरी आली असता मुलगी घरात दिसून आली नाही. तिच्या आईने शेजाऱ्याकडे विचारपूस केली असता ती आढळून आली नाही. सायंकाळी पर्यंत गावात व नातेवाईकांकडे शोध घेऊनही तिचा काही थांगपत्ता लागला नाही.

अखेर मुलीच्या वडिलांनी रात्री वणी पोलीस स्टेशन गाठून मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. घरातून जाताना मुलीने कोणतेही मौल्यवान वस्तू, पैसे, दागिने व स्वतःचे कपडेसुद्धा सोबत नेले नसल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी कलम 363 भादंवि अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

हे देखील वाचा:

वणीला येत असताना तरुणाचा भीषण अपघात

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुडीपाडवा स्पेशल ‘ठंडा ठंडा कुल कुल’ ऑफर

Comments are closed.