जनगणनेसाठी प्रत्येकाला क्रांतीची मशाल हाती घ्यावीच लागेल- प्रा. नितेश कराळे

शेतकरी मंदिरात पार पडला मार्गदर्शन कार्यक्रम

जब्बार चीनी, वणी: आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे व आपल्या सडेतोड मतांसाठी प्रसिद्ध असलेले प्रा. नितेश कराळे, संचालक-फिनिक्स अकॅडमी, वर्धा आणि सोबतच उमेश कोर्राम, अध्यक्ष-स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांचे वणीत मार्गदर्शन शिबिर झाले. या कार्यक्रमात ओबीसी जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून क्रांतीची मशाल पेटविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन प्रा. कराळे यांनी केले.

रविवार दि.10 ऑक्टोंबरला शेतकरी मंदिर,वणी येथे दुपारी १ वाजता ओबीसी जातनिहाय जनगणना , स्पर्धा परिक्षा व करिअर गाईडन्स कार्यशाळेचे आयोजन ओबीसी (व्हिजे, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी-मारेगाव-झरी, जि. यवतमाळ द्वारे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदीप बोनगीरवार (अध्यक्ष-ओबीसी (व्हिजे, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी-मारेगाव-झरी)हे मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी शेतकरी मंदिर चा हॉल पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या अलोट गर्दीने भरलेला होता.मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, युवक व पालक वर्ग या कार्यशाळेला उपस्थित होता हे आजच्या कार्यशाळेचे एक विशेष वैशिष्ट्य होते. कराळे यांनी आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेत ओबीसी जातनिहाय जनगणना आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन करून सर्व श्रोतेगणांना मंत्रमुग्ध केले.

तत्पूर्वी उमेश कोर्राम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी व योजना विषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मा प्रा डॉ राम मुडे यांनी नुकतीच आचार्य पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले तर प्रास्ताविक वैभव ठाकरे व आभार प्रा आनंद बन्सोड सरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. देवीदास काळे (अध्यक्ष- दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी), प्रा बाळकृष्ण राजूरकर (अध्यक्ष- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय वणी), पांडुरंगजी पंडिले (मार्गदर्शक- ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती), बाबाराव ढवस (मुख्यसमन्वयक- ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती,मारेगाव), रहीमभाई शेख (समन्वयक- ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती), सविता रासेकर (समन्वयक- ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती), मायाताई आसुटकर ( मुख्याध्यापिका- अपंग निवासी कर्मशाळा,वणी), संजय खाडे ( अध्यक्ष- श्री रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड, वणी), मोहन हरडे गुरुजी (निमंत्रक- ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती), तसेच सत्कारमूर्ती प्रा डॉ राम मुडे (समन्वयक- ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती) मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओबीसी (व्हिजे, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी-मारेगाव-झरीचे समन्वयक नारायण मांडवकर, प्रवीण खानझोडे, सुरेश मांडवकर, विकास चिडे, गजानन चंदावार, दिलीप पडोळे, हेमराज कळंबे, विवेक ठाकरे, बाबाराव गेडाम, विजय दोडके, परिमल अँड्रस्कर, अमोल मिलमिले, दिलीप भोयर, प्रवीण लोंढे, विलास शेरकी, लिलाधार चौधरी, रवींद्र मिलमिले, संदीप मुत्यलवार, गजानन मत्ते, सुरज गिरसावळे, रघुनाथ कांडरकर, कवडू नागपुरे, संजय पेचे, गणेश काकडे, काशीनाथ पचकटे, राजू तुराणकार, ललित लांजेवार,

अशोक चौधरी, प्रा विजय बोबडे, प्रा दिलीप मालेकर, प्रमोद लोणारे, सागर जाधव, प्रा अनिल टोंगे, विनोद राजूरकर, आशिष साबरे, संजय गायकवाड, निळकंठ धांडे, राकेश बरशेट्टीवार, सुरेश राजूरकर, हेमंत गौरकर, रवींद्र ताटकोंडावर, अशोक अंकतवार, बंडू येसेकर, सुधीर खंडाळकर, गजानन तुराळे, राजेंद्र देवडे, रामराव गोहोकार, असिफ शेख,प्रा धनंजय आंबटकर, मधुकर रच्यावार,राजेश पहापळे, अमोल टोंगे, कृष्णदेव विधाते, भवानी मांदाडे, संजय गाताडे, अनिल आक्केवार, शरद तराळे, संजय चिंचोलकर, अजय भिवरकर आदीनी सहकार्य केले.

हे देखील वाचा:

अखेर बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

सोनीच्या टीव्हीच्या EMI वर पहिली किश्त मोफत

Comments are closed.