वृद्धाचा आढळला बस स्टॅन्ड जवळ मृतदेह, घात कि अपघात ?
अन् यामुळे वाढले मृत्यूचे गुढ....o
देव येवले, मुकुटबन: बस स्टॉप व आठवडी बाजार परिसरात सफाई करणारा वयोवृद्ध रामदास वरगंटीवार (75) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात बस स्टॅण्ड चौकात आढळून आला. ही खबर पोलिसांना समजताच ठाणेदार गुलाब वाघ, सा.पो.नि. नेहारे सह इतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. चौकशी करून मृत्यूदेह शवविच्छदन करीता झरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला
मृतक रामदास वरगंटीवार हे बस स्टॅण्ड परीसरात नेहमी सफाई करायचे. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांचा डोक्याला, उजव्या कानाजवळ व गुप्तअंगास झालेली जबर मार लागून रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. बाजुला त्यांचे कपडे अस्तव्यस्त पडले होते. यामुळे तिथे एकच गर्दी जमली.
यामुळे वाढले मृत्यूचे गुढ
हा अपघात असून कोणत्यातरी अज्ञात वाहनाचा त्यांना धक्का लागला, त्यामुळे ते तडफडत फिरले असेल असा प्राथमिक अंदाज ठाणेदार वाघ यांनी व्यक्त केला. तर स्थानिकांच्या मते हा अपघात नसून खून आहे. सोमवारला रामदास यांनी निराधारचे पैसे काढले होते. ते पैसे गायब असल्याने कुणीतरी पैशासाठी मारून फेकले असावे असा तर्क लावले जात आहे.
रामदास चा मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यावर माहिती समोर येईल. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो. नि. नेहारे , संदीप सोयाम, नीरज पातुरकर , प्रदीप कवरासे हे करीत आहे .