अनाथ तेजस्वीनीला व्हायचंय पोलीस… राजू उंबरकर यांनी स्वीकारले पालकत्व

दोन वर्षापूर्वी वडिल व त्यानंतर लगेच आईचे निधन झालेने पोरक्या झालेल्या तेजस्वीनीची कहाणी....

विवेक तोटेवार, वणी: तेजस्वीनी ही बोर्डा येथे राहते. ती बारावीत शिकते. तिचे पोलीस दलात सामिल होण्याचे स्वप्न होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दोन वर्षापूर्वी तिचे आईवडील वारले. ती पोरकी झाली. त्यामुळे तिचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र आता तिचे पोलीस दलात सामिल होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मनसे नेते राजू उंबरकर यांनी उचलले आहे. त्यांनी तिचे पालकत्व स्विकारले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी तसेच जनतेच्या समस्या जाणुन घेण्यासाठी गाव भेटी आयोजित केल्या आहे. वणी तालुक्यातील बोर्डा येथे त्यांनी 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता भेट दिली. गावभेटी दरम्यान त्यांना गावातील कु. तेजस्विनी सतिश नक्षिने हिची कहाणी माहिती झाली. एका महिलेने त्यांना तिच्याबाबत माहिती दिली.

ही माहिती मिळताच राजू उंबरकर यांनी तात्काळ तेजस्वीनीची भेट घेण्याचे निश्चय करत आपला मोर्चा तेजस्वीनीच्या घराकडे वळवला. तिची भेट विचारपुस केली असता त्यांना तिच्या घरात थकलेल्या आजी-आजोबा शिवाय कोणीच नसल्याचे आढळले. आजोबाला मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावर सध्या त्यांचे कसेबसे घर चालत आहे. त्यातच तेजस्वीनीचे शिक्षण देखील सुरू आहे.

12 वी झाल्या नंतर तेजस्वीनीला पोलीस दलात सामिल व्हायचं होतं. ज्या आई वडिलांच्या भरवशावर तिने पोलीस बनण्याचे स्वप्न पाहिलं होतं. मात्र दोन वर्षांआधी तिच्या वडिलांचं किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला. हे दु:ख पचन नाही तोच तेजस्वीनीला तिच्या आईला कॅन्सर असल्याचे कळले. वडिलांच्या मृत्यूनंतर 6 महिन्यातच तिच्या आईचेही निधन झाले.  आजोबाचे अवघे 7 हजाराचे पेन्शन त्यात घरखर्चच चालणे मुश्कि. त्यामुळे तेजस्वीनीचे स्वप्न जागीच विरले. 

ही खंत तिने राजू उंबरकर यांच्याकडे व्यक्त केली. हे ऐकूण राजू उंबरकर यांनी तात्काळ तिचे पालकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर करून तिला बळ दिले. यापुढे तिच्या सर्व शिक्षणाची आणि जो पर्यंत पोलीस दलात सामिल होत नाही तोपर्यंत सर्व जबाबदारी उचलण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

त्यांच्या या भूमिकेचे समाजातील सर्वच स्तरांतुन स्वागत होत आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, अजिद शेख, अमोल ताजने, लक्ष्मण उपरे, पुरुषोत्तम दुमोरे, प्रणय गौरकर, योगेश झाडे यांच्या सह गावांतील सर्व गावकरी उपस्थित होते.

Comments are closed.