पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्षपदी राकेश सवंत्सरे
नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या अहमदनगर येथील बैठकीत निर्णय
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राकेश चंद्रकांत सवंत्सरे यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टी NSP (U) संलग्न माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य याच्या वणी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत आपटे यांच्या मार्गदर्शनात अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या वेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे, समस्त विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक प्रकाश भारती, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. बैठकीत यवतमाळ येथील जिल्हाध्यक्ष अजय कंडेवार यांनी राकेश सवंत्सरे यांचे नाव सुचवले व त्याला इतर सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भारतीय संविधानाला अभिप्रेत शास्वत विकासासाठी, सामाजिक न्याय व हक्क यांच्यासाठी ही संघटना काम करते. याशिवाय प्रशासकीय बेजबाबदारी, अन्याय, भ्रष्टाचार, अवैध धंदे, पत्रकारांवर होणारे हल्ले, गोरगरीबांवर होणारा अत्याचार याविरोधात ही संघटना राज्यभरात काम करते.
संघटनेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. तो मी सार्थ करेल अशा मत यावेळी राकेश सवंत्सरे यांनी व्यक्त केले. त्यांच्या नियुक्ती बद्दल परिसरात स्वागत करण्यात येत असून त्यांचे या निवडीबाबत कौतुक होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)