वणी शहरातील अवैध बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ हटवा

सिद्धीक संगरजे यांची मागणी, मुख्याधिकारींना निवेदन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विविध चौकात अनधिकृत बॅनर होर्डिंग्ज लावलेले आहेत. त्यामुळे शहराचे विकृतीकरण होत आहे. तसेच हे बॅनर पडून जिवीत हानी देखील होऊ शकते त्यामुळे हे अनधिकृतरित्या असलेले बॅनर तात्काळ हटवावे अशी मागणी माजी नगरसेवक सिद्धीक रंगरेज यांनी व सहका-यांनी केली आहे. नगर पालिकेच्या शाळा क्रमांक 2 समोरील पालिकेच्या कॉम्प्लेक्सवर मोठ मोठे होर्डिंग्ज लावलेले आहेत. याच्या शेजारीच शाळा भरते. तसेच खाली दुकाने असल्याने येथे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची रेलचेल असते. सध्या पावसाळा सुरु झाला असून वादळी वा-यामुळे हे होर्डिंग्ज पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच शेजारी असलेल्या हुतात्मा स्मारकाच्या शेजारी देखील मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेले आहेत. हा हुतात्म्यांचा अपमान आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना सिद्दीक रंगरेज, सुमेर खान, धम्मा देठे, मोहीस काजी, समीर बेग, अमोल पारीख उपस्थीत होते.

Comments are closed.