सावधान…! वणीत आज 12 तासांसाठी कलम 144 लागू

त्रिपुरा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेश

जितेंद्र कोठारी, वणी: त्रिपुरा येथे घडलेल्या जातीय हिंसाचार व त्यानंतर राज्यातील अमरावती, नांदेड व अकोला जिल्ह्यात घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एका दिवसासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत रविवार 21 नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमित केले.

आदेशानुसार जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, बाभूळगाव, आर्णी, नेर, राळेगाव, कळंब, वणी, मारेगाव, झरीजामणी, घाटंजी, केळापूर या शहरी भागाच्या हद्दीमध्ये सोमवार दि. 22 नोव्हे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजे पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया सहींता 1973 चे कलम 144 अनव्ये लागू या आदेशानुसार या कालावधीत एका ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांचा जमाव करता येणार नाही.

या कालावधीत कोणत्याही प्रकारची रैली, धरणे, आंदोलने, मोर्चा काढता येणार नाही. या दरम्यान कोविड लसीकरणचे कार्य नियमितपणे सुरु राहणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता (1860 चा 45) याच्या कलम 188 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात येईल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

बाहेरगावी जातो सांगून निघालेल्या इसमाचा आढळला मृतदेह

बुलेटची दुचाकीला धडक, एक ठार व एक जखमी

Comments are closed.