शिरपूर पोलिसांची रेती चोरट्यावर कारवाई

रेती व ट्रॅक्टर जप्त, ढा. बोरी जवळ कारवाई

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडले. या कारवाईत एक ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक मालक असलेल्या सतिष देवीदास काकडे वय 32 वर्षे रा. ढाकोरी ता. वणी याला अटक करण्यात आली. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

बुधवारी शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांना पैनगंगा नदीतून रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी परिसरात पेट्रोलिंग करणा-या कर्मचा-यांना याची माहिती दिली. त्यावरून पोउपनि रावसाहेब बुधवत, पोह. गंगाधर घोडाम, नापोकाँ गजानन सावसाकडे यांनी या मार्गावर धाव घेतली.

दरम्यान त्यांना ढाकोरी बोरी जवळ एक लाल रंगाचे ट्रॅक्टर (MH 29 BC-4173) येताना दिसले. पोलीस पथकाने ट्रॅक्टर थांबवले व ट्रॉलीची तपासणी केली. त्यात एक ब्रास रेती होती. पोलिसांनी याबाबत चालकाला विचारणा केली असता त्याच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करीत ट्रॅक्टर किंमत 5 लाख व रेती 4 हजार असा मुद्देमाल जप्त केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी ट्रॅक्टर मालक सतिष देवीदास काकडे वय 32 वर्षे रा. ढाकोरी ता. वणी जि. यवतमाळ याच्या विरोधात भादंविच्या कमल 379 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 15, सहकलम महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई डॉ. पवन बन्सोड पोलीस अधिक्षक साहेब, यवतमाळ. पियुष जगताप साहेब अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे शिरपुर यवतमाळ येथील सहा. पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोउपनि/रावसाहेब बुधवत, पोहवा/गंगाधर घोडाम नापोकों/गजानन सावसाकडे यांनी पार पाडली.

वणीत धावणार रेल्वे इंजिन? विधानसभा मनसेच्या क्वोट्यात?

Comments are closed.