श्री काशी शिवपुराण कथेच्या आयोजनासाठी शनिवारी महासभेचे आयोजन

एसबी लॉन येथे विविध समित्यांची होणार स्थापना, भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन...

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथे दिनांक 27 जनवरी ते 2 फरवरी 2024 दरम्यान श्री काशी शिवपुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) हे शिवपुराण कथा वाचन करणार आहे. या कार्यक्रमात लाखो भाविक सहभागी होणार असून या भव्य दिव्य कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आयोजनासाठी विविध समित्या स्थापन केल्या जाणार आहे. त्यासाठी शनिवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील एसबी लॉन मध्ये स. 11 ते दु. 3 वाजेपर्यंत ही सभा  आहे. यात सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजनात सेवा देऊन सहभाग दर्शवावा, असे आवाहन मुख्य संयोजक राजकुमार जयस्वाल यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

वणी व परिसरातील हजारो शिवभक्तांच्या सहकार्याने शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ रोडवरील पळसोनी फाटा परिसरात 25 एकर परिसरात कथा मंडप तयार करण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांच्या भोजन व महाप्रसादाची व्यवस्था 10 एकर जागेत करण्यात येणार असून केवळ वाहने पार्क करण्यासाठी 20 एकरचे भव्य पार्किंग तयार करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व व्यवस्थेसाठी व्यवस्थेसाठी 25 पेक्षा अधिक वेगवेगळ्या समिती राहणार असून महासभेत याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. सभेनंतर 5 वाता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व शिवभक्त राजकुमार जयस्वाल व त्यांच्या पत्नी शिवभक्त श्रद्धा जयस्वाल यांच्या पुढाकारातून तसेच परिसरातील शिवभक्तांच्या साथीने श्री काशी शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताे आयोजित महासभेला शिवभक्तांनी हजर राहावे, असे आवाहन राजकुमार जयस्वाल व श्रद्धा जयस्वाल यांनी केले आहे.

वणीत तुटणार गर्दीचा उच्चांक?
प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेले प्रवचनकार आहेत. त्यांचे देशातच नाही तर विदेशात देखील शिव पुराणकथा वाचनाचे (सत्संग) कार्यक्रम झाले आहे. त्यांच्या प्रत्येक कथावाचनात गर्दीचे उच्चांग मोडले जातात. वणी येथील शिवपुराण कथावाचनासाठी सुमारे 8 ते 10 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा देखील वणीच्या इतिहासातील एक रेकॉर्ड राहील.

Comments are closed.