मॅराथॉन स्पर्धेत क्रिश मिस्त्री व अंजली पचारे प्रथम

अंडर 16 गटात नील नाने व वैष्णवी मेश्राम प्रथम, शिवसेना, युवासेने तर्फे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त दिनांक 23 ला सकाळी 7 वाजता शिवतिर्थावर भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुलांच्या खुल्या गटातून क्रिश सचिंद्र मिस्त्री तर मुलींच्या खुल्या गटातून अंजली देवराव पचारे ही प्रथम आली. अंडर 16 मुलांच्या गटात नील शंकर नाने तर मुलींच्या गटात वैष्णवी दिनेश मेश्राम ही प्रथम आली. आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा घेण्यात आली. शेकडो विद्यार्थी व मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

मुलांच्या गटातून दुसरा ओम विश्वजीत गारघाटे, तिसरा कुणाल विठ्ठल तोडासे व चौथे बक्षिस रोहित दादाजी ढेंगळे यांनी पटकावले. मुलींच्या ओपन गटातून दुसरे बक्षीस गायत्री मंगेश खोंडे, तिसरे बक्षीस अस्मिता मनोज वाळके व चौथे बक्षिस आचल संदीप झिले हिने पटकावले. तसेच 16 वर्षा आतील दुसरे बक्षीस हसन सय्यद, तिसरे शिवम भोलेनाथ ओझा, तर चौथे बक्षीस वीर गुलाब तांबेकर यांनी पटकावले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तसेच 16 वर्षा आतील मुलींच्या गटातून श्रुती बापूराव मडावी दुसरी, शिल्पा लक्ष्मण आत्राम तिसरी तर प्रांजली विलास डोहे हीने चैथा क्रमांक पटकावला. यावेळी विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमध्ये सर्वात लहान धावपटू मुले व नाझिया मिर्झा ऑल इंडिया चॅम्पियन औरंगाबाद यांना पारितोषिक व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान वणी शहरातील स्केटिंग स्पर्धकांनी स्केटिंगचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या मनोगतात किरण देरकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करीत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विजेत्यांना शिवसेना, युवासेनेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्केटिंग मास्टर मनस्वी पिपरे हिचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी शिवसेना शहर प्रमुख राजु तुराणकर, चिखलगाव सरपंच रुपाली कातकडे, सुरेखा ढेंगळे, माधुरी सुंकुरवार, मिनाक्षी मोहिते, प्रकाश कऱ्हाड, क्रीडाप्रशिक्षक महेश पहापळे, संतोष बेलेकर, गणेश मोहितकर, जगदीश ठावरी, आनंद घोटेकर, सुरेश शेंडे, संजोग झाडे, तुळशीराम काकडे, प्रविण खानझोडे, मिलिंद बावणे, मंगल भोंगळे, मनीष बत्रा, गणेश जूनगरी, चेतन उलमले, विवेक ठाकरे, व सूरज चाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

बियर पिल्याने मुतखडा जातो का? मुतखड्यात बियर किती फायदेशीर?

Comments are closed.