शुभांगी जरुरकर भालेराव यांचे अल्पशा आजाराने निधन

लोकमान्य टिळक महाविद्यालयात होत्या कार्यरत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशपूर येथील अष्टविनायक सोसायटी येथील रहिवासी असलेल्या शुभांगी जरुरकर भालेराव यांचे आज सकाळी नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 45 वर्षांच्या होत्या. शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्या लिपिक पदावर कार्यरत होत्या. प्रशांत भालेराव हे त्यांचे पती आहेत. चार दिवसाआघी प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना नागपूर येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज गुरुवारी दिनांक 23 मे रोजी दु. 11.30 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आज संध्याकाळी मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सं. 5 वा. त्यांचे राहते घर अष्टविनायक सोसायटी, विघ्नहर्ता बिल्डिंग येथून अंत्ययात्रा निघेल. त्याच्या पश्चात पती, दोन मुले व आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.