जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी हे गाव वणी यवतमाळ राज्य महामार्ग क्रं ६ वर आहे. राज्य महामार्ग असल्याने या मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मार्गाच्या बाजुलाच लागुन जि.प. शाळा, कै. बालाजी पंत चोपने महाविद्यालय व अंगणवाडी आहे. त्याच बरोबर बोटोणी हे गाव केंद्र असल्याने खेडयावरून येणारे रस्ते सुद्धा महामार्गाला जोडले असल्याने वर्दळ असते. मात्र तरीदेखील या गावातील रस्त्यावर गतीअवरोधक नाही त्यामुळे इथे अपघाताची भीती वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांनी गतीअवरोधकाची मागणी केली आहे.
या महामार्गावरून येणाऱ्या सुसाट वाहनांमुळे बऱ्याच वेळेस दुचाकीस्वारानं जनावरांना उडवले आहे. तसंच इथं छोट्या मोठ्या अपघाताचं प्रमाण ही बरंच आहे. या प्रकरणी निवेदन देऊ इथे गतीअवरोधक तयार करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. वेळो वेळी संबधीत रस्ते बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र बांधकाम विभागाने त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. या आधीही समस्येकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिकांंनी चक्का जाम आंदोलन केलं होतं. जर यावेळी मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिला.