दीकुंडवार ट्यूशन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

दहावी, बारावी व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील रंगारीपुरा स्थित दिकुंडवार इंग्लिश ट्युशन क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दीकुंडवार इंग्लिश ट्यूशन क्लासेस मध्ये दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. अनेक स्पर्धाही घेण्यात येतात. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असतो. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजू धावंजेवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून एसबीआय लाइफ इन्शुरन्स वणीचे व्यवस्थापक शैलेश आडपावार, नगरपरिषद आरोग्य विभागाचे प्रमुख सुभाष नरपांडे तर वणी तालुका शिंपी समाज संस्थेचे कोषाध्यक्ष कैलास करनेवार यांची उपस्थिती होती.

यावेळी इयत्ता बारावी मध्ये उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी नरपांडे व इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी सायली पंढरीनाथ महाकुलकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चित्र रेखाटल्यामुळे अंकिता कायरकर, पियुष पारखी तर काव्यवाचन स्पर्धेत चिन्मय अवचट, साहील करणेवार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे भवितव्य हे शिक्षकांच्या हातात असते तेव्हा विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन यश संपादन करावेत असे मनोगत राजू धावंजेवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार दिकुंडवार यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.