रविवारी गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांची रॅली, पथनाट्य राहणार प्रमुख आकर्षण

शाळा क्रमांक 8 चा उपक्रम, कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त वणीत नगर पालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 च्या विद्यार्थ्यांची भव्य प्रभातफेरी निघणार आहे. विद्यार्थ्यांद्वारा सादर केले जाणारे पथनाट्य हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, मुख्‍याधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळी 8 वाजता सेवानगर शाळा क्रमांक 8 ते गांधी चौक अशी रॅली निघणार आहे. सकाळी 8.30 वाजता महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळयाला मान्यवरांच्‍या हस्‍ते हारार्पण केले जाणार आहे. त्यानंतर गांधी चौकात विद्यार्थ्‍याद्वारा गांधीजींच्‍या जीवनावरील प्रसंगाचे सादरीकरण केले जाणार आहे.

सकाळी 10 वाजता गांधाी चौक येथून रॅली टिळक चौक जाणार आहे. शिवतीर्थ येथे सकाळी 10.30 वाजता गांधीजींच्‍या विचारांवरील पथनाट्य सादर केले जाणार आहे. त्यानंतर 11.30 वाजता टिळक चौक येथून रॅली निघून शाळा क्रमांक 8 येथे रॅलीची सांगता होणार आहे. त्यानंतर शाळा क्रमांक 8 येथे समारोपीय कार्यक्रम होणार आहे.

या गांधी चौक व शीवतीर्थ येथे चिमुकल्यांद्वारा सादर करण्यात येणा-या पथनाट्याला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन शाळा क्रमांक 8 चे शिक्षक व मुख्याध्यापक यांनी केले आहे.

Comments are closed.