वक्तृत्वकलेची धनी, बाल मुलाखतकार स्वामिनी कुचनकर

बहुगुणी कट्टा मध्ये वाचा प्रा. प्रशांत गोडे यांचे व्यक्तीविशेष आर्टिकल

मानवी क्षमता ह्या अदभूतच आहेत. ह्या क्षमतांना वयाचे वा कशाचेच बंधन नसते. आज सर्व बंधने झुगारून चिमुकली मुले समाजात लक्ष वेधीत आहेत. कुणी रियालिटी शोच्या माध्यमातून नृत्य, गायन, नकला, विनोद अशा अनेक प्रकारांतून भल्या भल्या दिग्गजांना अचंबित करत आहेत. हे आपण सर्व टीव्हीवर बघतोच. अशाच एका चिमुकलीने एक धनुष्य उचलले. तिने ते सहज पेलले. त्या मुलीचे नाव आहे स्वामींनी प्रशांत कुचनकर. ती निलजई (सुंदरनगर) येथील डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत आहे.

वक्तृत्वकला ही तिला मिळालेली जणू उपजतच देण. स्वामींनीने अनेक व्यासपिठांवरून आपले सादरीकरण केले. दिवंगत खा. बाळूभाऊ धानोरकर, खासदार भावनाताई गवळी यांच्या समक्ष यवतमाळ तसेच चंदपूरच्या जनता कॉलेजमध्ये पदवीच्या विद्यार्थ्यांसमोर आणि वणीच्या लायन्स इंग्लिश मिडियम स्कूल, तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालय अशा अनेक कार्यक्रमांतून उत्कृष्ट सादरीकरण करुन उपस्थिताच्या प्रशंसा मिळवल्यात.

या कार्यक्रमांतून स्वामींनीचा प्रवास सुरु होता. यामध्ये तिला मोलाची साथ व मार्गदर्शन मनीषा ठाकरे आणि प्राचार्य प्रशांत गोडे यांचे मिळाले. आई-वडील तर पाठीशी आहेतच. या वरील सर्व कार्यक्रमांत विषय जो होता तो एकच आणि तो म्हणजे आय. पी. एस. अधिकारी विश्वास नांगरे पाटील ह्यांचा प्रशासकीय लोकप्रिय प्रवासाचा.

महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांचे ते रोल मॉडेल. जवळजवळ दोन दशकांपासून या उत्तुंग व्यक्तीत्वाने सर्वाना भुरळ पाडली. अशा या उच्चपदस्थ आणि आदर्श अधिकाऱ्यांची जीवनगाथा मोठ्या उत्साहात स्वामींनीने विद्यार्थीसमूह व जनसमूहासमोर सादर केली. जिथे तिला पोहचायचे होते, त्या क्षणाची ती जी वाट बघत होती. तो क्षण नाशिकमध्ये येऊन पोहचला होता. ती त्या क्षणाजवळ पोहचली होती. नंतर जे घडले ते अकल्पित होते.

विश्वास नांगरे पाटील म्हणजे एक कणखर, धाडसी, जबाबदार, कर्तव्यकठोर, अभ्यासू, संवेदनशील, कार्य पूर्णत्वास नेणारी जिद्दी व्यक्ती. अशा बहुआयामी या व्यक्तीचे गुणविशेष समस्त महाराष्ट्र जाणतो. मुंबईच्या हॉटेल ताजमधील त्यांचे शौर्य समस्त देशाने बघितले आहे. वरील उल्लेखनिय त्यांच्या गुणविशेषांना कुठलाही धक्का लागू न देता स्वामींनीने त्यांच्यासमोरच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कांगोरे उलगडले. ते ऐकून स्वयं विश्वास नांगरे पाटील अचंबित झालेत. हे सादरीकरण त्यांच्या नाशिकच्या कार्यालयात प्रस्तुत केले.

अलगद व हळुवारपणे स्वामींनीने त्यांची मने जिंकलीत. प्रत्येक क्षण महत्वाचा असलेल्या या अधिकाऱ्यांनी व्यस्त कार्यक्रमांतून स्वामींनीला वेळ दिला. ह्या चिमुकलीने हे धाडस दाखवत स्वतःचाही कणखरपणा सिद्ध केला. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला, अशी भावना विश्वास नांगरे पाटील याचे पी. आर. ओ. भगत तसेच उपस्थित कमिश्नर कार्यालयाचे कर्मचारी व स्वामींनीच्या आई-वडलांनी व्यक्त केली. असे गुणी विद्यार्थी ही या समाजाची अनमोल संपत्ती आहेत. असेच स्वामींनीचे नेतृत्व आणि वक्तृत्व अधिक वृद्धिंगत होत राहावे.

स्वामिनीने राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेतली. त्यांच्याकडून राजकीय जीवन, बालपण, राज्याच्या परिस्थितीवरती सखोल माहिती तिने आत्मसात केली. एरवी विधानसभेत नेहमी आक्रमक असणारे सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र स्वामींनीचा प्रत्येक प्रश्न अतिशय शांत आणि संयमाने सोडवून दिला.

शिक्षकदिनानिमित्त गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सुद्धा स्वामींनीशी बोलताना ‘मी कसा घडलो’ आणि यशस्वी होण्यासाठी प्लॅन किंवा अभ्यास कसा करायचा यावर दिलखुलास चर्चा केली. तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये टॉप पाचमध्ये येणे याची जिद्द असणे हा गुणधर्म दिला. सोबतच स्वामींनीला भविष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

स्वामींनीचा प्रवास इथपर्यतच थांबला नाही. तर दि. 6 ऑक्टोबर 2023ला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या संसद भवनाचासुद्धा शैक्षणिक दौरा केला. यात स्वामींनीला देशाचे संसदीय अधिवेशन चालतात त्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत जाऊन कामकाज कसे चालते? सत्ताधारी आणि विरोधी सदस्य कोणत्या दिशेला बसतात. बहुमत चाचणीच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक बटण कसे वापरतात.

लोकसभेच्या सभागृहाला हिरव्या, तर राज्यसभेच्या सभागृहाला लाल रंगाने ओळखले जाते. तसेच सेंट्रल हॉलचेसुद्धा महत्व स्वामींनीने समजून घेतले. या सभागृहाला राष्ट्रपती संबोधित करतात. या सर्व गोष्टी संसदेच्या अधिकृत व्यक्तीकडून समजून घेतल्या.
स्वामींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा….

शब्दांकन……
प्राचार्य प्रशांत गोडे,
लायन्स इंग्लिश मीडिया स्कूल, वणी

Comments are closed.