बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा 4 वर्षांपासून ठाण्यात ठिय्या
पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला ठाणेदारकडून ठेंगा
सुशील ओझा, झरी: जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे फर्माण सोडले. याच अनुषंगाने जिल्यातील अनेक ठिकाणावरील अवैध धंदे बंद करण्यात आले. तसेच बदली होऊन त्याच ठाण्यात संलग्नच्या नावावर किंवा अधिकाऱ्यांच्या मर्जीने राहत असलेल्या कर्मचारी किंवा अधिकारी यांना त्वरित सोडण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले होते.
सदर आदेशाचे पालन अनेक ठाण्यातून झाले परंतु मुकुटबन पोलीस स्टेशन मधील दोन कर्मचाऱ्यांना अजून पर्यंत सोडण्यात आले नाही. सुलभ उईके बक्कल नं 2208 व प्रदीप कवरासे बक्कल नं 1775 असे दोन्ही कर्मचाऱ्यांचे नाव असून उईके यांची मारेगाव तर कवरासे याची पाटण पोलीस स्टेशनला बदली झाली आहे. परंतु ठाणेदार यांच्या मर्जीतील व जवळील कर्मचारी असल्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले नाही, अशी चर्चा परिसरात आहे.
यावर्षी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यांना सोडण्यात आले परंतु 9 वर्षांपासून त्याच ठाण्यातील वरील दोन्ही कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले नाही. दोन्ही पोलीस कर्मचारी यांना न सोडण्याकरिता ठाणेदार हे वरीष्ठ अधिका-यांकडे सेटिंग करीत असल्याची चर्चा पोलीस कर्मचाऱ्यातच सुरू आहे.
मुकुटबन ठाण्यात कार्यरत असलेले रमेश मस्के व राम गडदे यांनी अतिरिक्त जिल्हा पोलिस आधीकारी यांना व्हाट्सएप वर ठाणेदार धर्मा सोनुने कर्मचारी सुलभ उईके व प्रदीप कवरासे यांची तक्रार केली होती. ठाणेदार यांनी ४ वर्षांपूर्वी बदली झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांची नावे जिल्हा अधीक्षक यांच्यापासून लपविले व त्यांना बदली झालेल्या ठिकाणी सोडले नाही. तर आम्ही दोघेही ड्युटीवर असताना ठाण्यात वापसी देण्यापूर्वीच कोणतीही सूचना न देता आम्हाला बदली झालेल्या ठिकाणी सोडले. आमच्यावर अन्याय झाला असून उईके व कवरासे यांना का सोडण्यात आले नाही अशी तक्रार करण्यात आली होती.
परंतु मस्के व गडदे यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. उईके व कवरासे हे ठाणेदार यांच्या मर्जीतील व जवळचे असल्याचे मानले जाते ज्यामुळे ठाणेदार त्यांना बदली झालेल्या ठिकाणी सोडत नसल्याची ओरड पोलीस वर्तुळात आहे. ज्यामुळे ठाण्यात दोन गट पडले आहे.
अवैध दारू विक्री व दारू तस्करी, जनावर तस्करी, गुटखा तस्करी, ट्रान्स्पोर्टिंग, अवैध वाहतूक, ब्लास्टिंग, अवैध रेती व मुरूम तस्करीची वसुली मोठ्या प्रमाणात चालते. या दोन कर्मचा-यांवर ठाणेदार यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपच विभागातील इतर कर्मचारी करीत आहे. जिल्ह्यातील बहुतांश पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी केल्या परंतु मुकुटबन येथील दोन कर्मचारी 9 वर्षांपासून एकाच ठिकाणी असतांना त्यांची बदली होणार की नाही असाही प्रश्न पोलीस वर्तुळात उभा केला जात आहे.
हे देखील वाचा: