किराणा माल व बॅटरी चोरणाऱ्या तिघांना अटक

27 हजाराचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: दुकाने फोडून किराणा सामान लंपास करणाऱ्या एका चोरट्याला तसेच उभ्या ट्रकच्या दोन बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. तिघांकडून पोलिसांनी 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विकास उर्फ विक्रांत मडावी (28), रा. मेंढोली, नितीन ठावरी (25) रा. कृष्णानपूर व प्रविण कुमरे (28) रा. मोहदा सर्व ता. वणी असे अटक करण्यात आलेल्याआरोपीचे नाव आहे.

मेंढोली येथील बंडू शंकरराव उपलेंचीवार व जितेंद्र राजेंद्र मेहता यांची किराणा दुकाने फोडून तब्बल 50 हजारचा कीराणा माल चोरी झाला होता. तपासादरम्यान सदर चोरी मेंढोली गावातीलच विकास उर्फ विक्रांत मडावी यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शिरपूर पोलिसांनी 23 फेब्रुवारी रोजी आरोपी विकास मडावी यास अटक केली. आरोपी कडून 6 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तालुक्यातील वेळाबाई फाटा येथे उभ्या असलेल्या ट्रकच्या 2 बॅटऱ्या चोरी गेल्याची तक्रार 23 फेब्रुवारी रोजी फिर्यादी अजय विठ्ठल निब्रड यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी ठाणेदार करेवाड यांनी वेगाने तपासचक्र फिरवून घटनेच्या 24 तासाच्या आत आरोपी नितीन ठावरी (25) रा. कृष्णानपूर व प्रविण कुमरे (28) रा. मोहदा याला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून चोरी गेलेल्या दोन्ही बॅटऱ्या किंमत 20 हजार पोलिसांनी जप्त केल्या.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक राम कांडुरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

Comments are closed.