वैदर्भीय कलावंतांनी दाखवला प्रतिभेचा नृत्याविष्कार

प्रयास व क्रांतिज्योती फेडरेशनची विदर्भस्तरीय नृत्यस्पर्धा रंगली

बहुगुणी डेस्क, वणी: वणी म्हणजे विदर्भाची सांस्कृतिक राजधानी. वर्षभर इथं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. अनेक प्रतिभावंत आपला कलाविष्कार सादर करतात. असाच विदर्भातील कलावंतांनी नृत्याचा अविष्कार प्रस्तुत केला. निमित्त होतं, प्रयास व क्रांतिज्योती फेडरेशन द्वारा आयोजित विदर्भस्तरीय राजे नृत्य स्पर्धा. यावेळी आयोजक दाम्पत्य सुरेंद्र निब्रड व मनीषा सुरेंद्र निब्रड यांचा यासाठी प्रयास व क्रांतिजोती फेडरेशनने त्यांचा शाल तथा श्रीफळ देऊन सन्मान केला.

विदर्भाच्या मातीतील नृत्यकलावंताच्या सुप्त कलागुणाना वाव देण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्ता मनीषा निब्रड यांच्या आयोजनात विदर्भ स्तरीय राजे नृत्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत नागपूर, चंद्रपूर, वरोरा, भंडारा, यवतमाळ, वाशिम, उमरखेड, गोंदिया व स्थानिक तसेच परिसरातील स्पर्धकांनी भाग घेतला. एकल नृत्य व समूह नृत्य असे कला प्रकार सादर झालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विदर्भातील नृत्य कलावंतांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली. या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन किरण देरकर यांनी केले. अध्यक्ष म्हणून वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष आशीष खुलसंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. देविदास काळे, प्रमोद वासेकर, अॅड. पौर्णिमा शिरभाते, माधव सरपटवार, वंदना आवारी, साधना गोहोकार, शारदा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपूर येथील परीक्षकांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. त्यात गौरव श्रीरंग, शुभांगी सरोदे, अश्विनी मानेकर यांचा सहभाग होता. आयोजन समितीकडून या तिन्ही परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रियंका कोटनाकेसह सागर मुने यांनी केले. तर आभार आजोजिका मनीषा निब्रड यांनी मानले.

Comments are closed.