विजय चोरडिया ‘आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर येथे एका शानदार सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

निकेश जिलठे, वणी: गेल्या 25 वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असलेले व दातृत्त्वाचे धनी विजय चोरडीया यांना नागपूर येथे ‘आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विजय चोरडिया यांची परिसरात एक समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी अशी ओळख आहे. गेल्या 25 वर्षांपासून तन, मन, धनाने त्यांचे कार्य सुरू आहे. गेल्या वर्षी आलेल्या महापुराचा अनेक नदीकाठच्या गावांना फटका बसला. पूरग्रस्तांसाठी त्यांनी तात्काळ धावून जात पूरग्रस्तांसाठी त्यांनी तात्काळ मदत पोहोचती केली होती.

कोरोना काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले होते. ही परिस्थिती पाहून विजय चोरडिया यांचे मन हेलावले. त्यांनी गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करून आपल्यातील दातृत्वाचा परिचय समाजाला करून दिला.

गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपला फोकस आरोग्यसेवेकडे वळवला आहे. वणीसह परिसरातील अनेक गावी त्यांनी त्यांनी अनेक मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले. सुमारे 300 पेक्षा अधिक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी त्यांनी संपूर्ण मदत केली. तसेच 700 पेक्षा अधिक लोकांना चष्मा आणि औषधोपचाराची जबाबदारी त्यांनी उचलली. तसेच अनेक ठिकाणी त्यांनी कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी काम करणे सुरू केले आहे.

शैक्षणिक क्षेत्रातदेखील विजय चोरडिया सक्रीय आहेत. सन 2022 मध्ये वणीतील सर्वात मोठी शालेय स्पर्धा घेण्याचा विक्रमही त्यांनी केला. वणी शहरात त्यांच्या वाढदिवसानिमीत्त मॅराथॉन स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेत केवळ वणीतीलच नाही, तर यवतमाळसह नागपूर व अन्य जिल्ह्यातील धावपटुंनीदेखील या स्पर्धेत सहभाग नोंदविला. वणीचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

विजय चोरडिया यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे एका योग्य व्यक्तीचा सन्मान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांनी आपला पुरस्कार हा सर्वसामान्य लोकांना समर्पित असून यापुढेही असेच सामाजिक कार्य सुरू राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

Comments are closed.