पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमासाठी यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणून नूरजहाँ बेगम सलाम अहमद आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रोहित सुधाकर वनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केली. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. वनकर यांनी या नियुक्तीचे श्रेय महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सचिव डॉ. राणानूर सिद्धिकी, प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, ऍड. निलेश चौधरी, डॉ. दिनेश खेडकर आणि डॉ. प्रवीण कुलकर्णी यांना दिले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.

Comments are closed.