राष्ट्रीय एकता दिनानिमित्त वणीतील ओबीसी वेल्फेअर असोसिएशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर
लाेहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मानवतेचा संदेश
पुरुषोत्तम नवघरे, वणी: लाेह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त व “राष्ट्रीय एकता दिवस” या निमित्ताने वणी उत्तर क्षेत्रातील Backward Class (OBC) Coal Employees Welfare Associationच्या वतीने श्री हनुमान मंदिर, भाल्लर (वेलडा), वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. हेडगेवार रक्त केंद्र, नागपूर यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
कार्यक्रमात कामगार, सदस्य आणि समाजसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. एकूण 171 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन वणी उत्तर क्षेत्राचे महाप्रबंधक संचालन संजीवा रेड्डी यांच्या हस्ते झाले. क्षेत्रीय कर्मिक प्रबंधक आर. के. सिंह, प्रमुख पाहुणे किरण ताई देरकर आणि OBC Welfare Associationचे अध्यक्ष सुदामा यादव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यादव यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
संघटनेचे महामंत्री राकेश कडू यांनी OBC Welfare Associationच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि भविष्यातील दिशा यावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात उमरेड, नागपूर व मुख्यालय नागपूर क्षेत्रातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये उमेश फरकाडे (अध्यक्ष, उमरेड क्षेत्र), नरेन्द्र डुके (महासचिव, उमरेड क्षेत्र), प्रमोद वैद्य (कार्यकारी अध्यक्ष, उमरेड क्षेत्र), नरेन्द्र वाघमारे (सचिव, उमरेड उपक्षेत्र), परमेश्वर नांदुरकर (अध्यक्ष, नागपूर क्षेत्र) आणि चेतन शेलोकर (अध्यक्ष, मुख्यालय नागपूर) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या आयोजनात वणी क्षेत्राचे अध्यक्ष संकेत अरुण खोकले आणि सहसचिव जीवन पुंडलिक मत्ते यांच्या नेतृत्वाखाली राकेश उपरे, आकाश पिदूरकर, संजय खाडे (सूत्रसंचालन), मुक्तानंद भोंगळे, ऍड. प्रदीप क्षीरसागर, अजिंक्य मत्ते, शंकर देरकर, विलास खिरातार यांच्यासह असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी कार्याध्यक्ष संकेत खोकले यांनी उपस्थित मान्यवर, रक्तदाते आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या उपक्रमामुळे एकात्मतेचा संदेश देत समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, असोसिएशनच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.



Comments are closed.