10 दिवसांत बेसिक इंग्लिशमध्ये एक्स्पर्ट – वणीत समर कॅम्प

स्पोकन इंग्लिश व व्यक्तिमत्व विकासासाठी 2 मे ते 31 मे दरम्यान कॅम्प

बहुगुणी डेस्क, वणी: इंग्रजी वाचता-लिहिता येत असूनही प्रभावी संवाद साधताना अनेकांना अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी सराव व योग्य वातावरणाची गरज लक्षात घेऊन वणी येथे “उन्हाळी शिबिर 2026” अंतर्गत स्पोकन इंग्लिश व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता 3रीपासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, गृहिणी, व्यावसायिक व नोकरदार यांच्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे. “Learn | Play | Explore | Create” या संकल्पनेवर आधारित शिबिर सर्वांगीण विकासावर भर देणार आहे.नोंदणी १९ एप्रिलपासून सुरू झाली असून २ मेपर्यंत 7038204209 या क्रमांकावर करता येईल.

शिबिरात बेसिक इंग्लिशवर विशेष लक्ष देऊन इंग्रजी बोलण्याच्या सोप्या युक्त्या, संवादाचा सराव व आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. व्यक्तिमत्व विकास, वक्तृत्वकला, संभाषण कौशल्य, वाचनकौशल्य, डिजिटल लर्निंग, सुंदर हस्ताक्षर, प्राथमिक उपचार प्रशिक्षण व सामाजिक शिष्टाचार यांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. नेतृत्त्वगुण विकसित करण्यासाठी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाईल. “आरोग्यम् धनसंपदा” या सत्रात आरोग्यविषयक मार्गदर्शनही होईल.

प्रत्येक सहभागीला प्रिंटेड नोट्स दिल्या जातील. प्रशिक्षण हसतखेळत पद्धतीने घेण्यात येईल. स्विमिंग, इनडोअर-आऊटडोअर गेम्स, गटचर्चा, ध्यान, फोटोग्राफी, नृत्य व अभिनय यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. सहभागींसाठी एकत्रित सिनेमा प्रदर्शनही होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिबिराचा कालावधी २ मे ते ९ मे (लघुकालीन – ८ दिवस) व २ मे ते ३१ मे (दीर्घकालीन – ३० दिवस) असा असून सकाळी ७ ते ९, ९ ते ११ तसेच सायंकाळी ४ ते ६ व ६ ते ८ अशा बॅच वेळा ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेश मर्यादित असून केवळ 100 विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. नोंदणी १९ एप्रिलपासून सुरू झाली असून २ मेपर्यंत 7038204209 या क्रमांकावर करता येईल.

शिबिर वणीतील खालील चार केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे :

  • जैन लेआऊट येथील हनुमान मंदिर
  • टागोर चौक, KBC हाईट्स बिल्डिंग, नवीन महाराष्ट्र बँकेच्या वर
  • छोरिया लेआऊट, ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूल, हनुमान मंदिर जवळ
  • लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी

अधिक माहितीसाठी एस.पी. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात सागर जाधव (M.A., B.Ed.) यांच्याशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Comments are closed.