वणीत जागतिक छायाचित्र दिवस उत्साहात साजरा

फोटोग्राफी शिबिर तसेच मॉडेलिंग फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फोटोग्राफी दिनानिमित्त बाजोरिया हॉलमध्ये व्हिडीओ एडिटिंग या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश चांदवडकर होते. माधव सरपटवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात निवृत्त व ज्येष्ठ फोटोग्राफरचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शहरातील फोटोग्राफर एकता मंच द्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूरचे प्रसिद्ध व्हिडीओ एडिटिंग समरेश अग्रवाल यांनी व्हिडीओ एडिटिंग विषयावर कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेसाठी वणी, झरी, मारेगाव, चंद्रपूर, राजुरा, वरोरा व इतर ठिकाणी वरून व्हिडीओ ग्राफर, फोटोग्राफर आले होते. या शिबिरात एडिटिंग व फोटोग्राफीचे नवनवीन तंत्रज्ञान अग्रवाल यांनी शिकवले.या ठिकाणी मॉडेलिंग फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक पांढरकवडा येथील अमोल जयस्वाल, द्वितीय क्रमांक संकेत बोढे, तृतीय क्रमांक कायर चे नंदू कोसारकर यांनी प्राप्त केला.

फोटोग्राफर भवन बांधून देणार – आ. बोदकुरवार
अध्यक्षीय भाषणात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याबाबत फोटोग्राफर असोसिएशनचे अभिनंदन केले. वणी शहरात फोटोग्राफर भवन बांधून देईल, त्यात शहरातील कलावंत विविध प्रदर्शनी व कार्यक्रम घेऊ शकतील असे आश्वासनही त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिले. 

या कार्यक्रमात अनेक वर्षे फोटोग्राफी केली, परिसरात नवीन फोटोग्राफर घडवले अशा फोटोग्राफी मधून निवृत्त झालेल्या फोटोग्राफर सन्मान करण्यात आला. मधुकर सवरंगपथे, अनिल बिलोरिया, संतोष कोणप्रतिवार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व छायाचित्रकारांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी गणेश मॉल येथे भव्य लकी ड्रॉ योजना

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.