‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील अभिनेत्रीला जेलची हवा

फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टानं सुनावली शिक्षा

0 117

जालंधर: अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात करीना कपूरच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अलका कौशल आणि तिची आई सुशीला बडोला या दोघांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

अलका आणि तिच्या आईने जालंधरमधील एका गावातील अवतार सिंग नावाच्या ओळखीतल्या शेतकर्‍याकडून ५0 लाख रुपये उधार घेतले होते. मालिका बनवायची आहे, असे कारण देऊन हे पैसे या दोघांनी घेतले होते. दरम्यान, अवतारने हे पैसे परत मागितले असता त्याला २५-२५ लाखांचे दोन चेक देण्यात आले. मात्र हे चेक बाउंस झाल्याने अवतारने कोर्टात धाव घेतली. अलका आणि तिच्या आईने अर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्याने कोर्टात दाद मागितली.

अवतारची फसवणूक झाल्याचे सबळ पुरावे असल्याने कोर्टाने अलका व तिच्या आईला २0१५ मध्येच दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र, त्यानंतर या निकालाला संगरूर कोर्टात आव्हान देण्यात आले होते.

You might also like More from author

Comments

Loading...