विराट आणि अनुष्कानं केली शॉपिंग

सोशल मीडियात शॉपिंगचे फोटो व्हायरल

0 293

मुंबई: क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी सध्या चांगलीच प्रसिद्ध आहे. यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. सध्या हे प्रेमीयुगुल न्यूयॉर्क मध्ये सुट्टय़ांचा आनंद घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वत: विराटनेही अनुष्कासोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.

सध्या संपूर्ण बॉलिवूड चित्रपटसृष्टी १८ व्या आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी न्यूयॉर्क ला गेली आहे. स्वभाविकच अनुष्काही या सोहळ्याला उपस्थिती लावणार. पण या पुरस्कार सोहळ्यापूर्वी अनुष्काने प्रियकर विराट कोहलीसोबत परदेशात बरीच शॉपिंग केली असल्याचे दिसते. या प्रेमीयुगुलाने शुक्रवारी ग्रोसरी शॉपिंगही केली. ग्रोसरी स्टोअरमध्ये एकमेकांशी बोलण्यात मग्न झालेल्या विराट – अनुष्काचा फोटो एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या फोटोत अनुष्काने फिकट निळ्या रंगाचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस आणि स्निकर्स घातलेले दिसतात. तर विराटने काळे टीशर्ट आणि निळी डेनिम घातल्याचे दिसते.

विराटने गुरुवारी अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करत तो त्याच्या प्रेयसीसोबत व्हेकेशनवर जात असल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले. विशेष म्हणजे या फोटोला त्याने दिलेली कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधणारी ठरली. त्याने लिहिलंय की, माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत या ब्रेकची नितांत गरज होती. या कॅप्शनला त्याने ‘हार्ट’चे चिन्हही जोडले आहे. अनुष्का सध्या तिच्या आगामी जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाची वाट पाहत आहे. शाहरुख आणि तिची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २१ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

mirchi
Comments
Loading...