रेतीघाट तुरन्त सुरू करण्याची भारीप बहुजन महासंघाची मागणी

0 247

बहुगुणी डेस्क, वणी: भारीप बहुजन महासंघ वणीच्या वतीने मा.जिल्हाधिकाऱ्यांना रेतीघाट सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. गेल्या 5/6 महिन्यांपासून रेतीघाट बंद असल्यामुळं मजूरवर्गाची उपासमार होत आहे. त्यांना मिळेल ती कामं पोटाची भूक मिटवण्यासाठी वणवण भट्कावे लागत आहे. रेतीघाट बंद असल्यामुळे मजूरवर्गाचे जगणे कठीण होत आहे. तरीसुद्धा प्रशासन कोणत्याही प्रकारचे निर्णय घेताना दिसत नाही.

रेती माफियांच्या बेभाव तस्करीमुळे तर रेती घाट हर्रास होणे लेट केले जात आहे की काय अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारि यांना निवेदन देऊन 7 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे.या 7 दिवसात जर रेतीघाट हर्रास न झाल्यास भारीप बहुजन महासंघ वणी तालुकाच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन घेण्यात येईल. असे या निवेदन देताना सांगण्यात आले.यवतमाळ ता. महासचिव मंगल तेलंग, तालुका अ.किशोर मून तालुका महासचिव प्रशील उर्फ बंटी तामगाडगे, प्रशांत गाडगे संतोष पेन्दोर आणि भरपूर संख्येत मजूरवर्ग सहभागी झाले होते.

mirchi
Comments
Loading...