अखेर भेंडाळा जिल्हा परिषद शाळेला मिळाला शिक्षक

शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामवासीयांच्या मागणीला यश

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत २ शिक्षक कमी असल्याने मुलांच्या शिक्षणाशी खेळ सुरू होता. त्यामुळे लवकरात लवकर शाळेत दोन शिक्षक द्यावे अशी मागणी भेंडाळावासीयांनी केली होती. याबाबत ग्रामस्थांनी निवेदन देऊन उपोषणाचा इशाराही दिला होता. अखेर या शाळेला एक शिक्षक देण्यात आला आहे.

भेंडाळा शाळेत १ ते ७ वर्ग पर्यंत तुकड्या आहेत. यात मुलामुलींची एकूण पटसंख्या ९२ आहे. तर या विद्यार्थ्यांसाठी फक्त ३ शिक्षक आहेत. त्यातही एका शिक्षकाची बदली करण्यात आली ज्यामुळे आता तिथे फक्त दोनच शिक्षक होते.

वर्ग १ ते ५ ची पटसंख्या ६१ असून वर्ग ६ ते ७ वर्गाची पटसंख्या ३१ आहे. ९२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दोन शिक्षकाची मागणी केली होती. तसेच त्वरित शिक्षक न दिल्यास पंचायत समिती समोर उपोषण बसण्याचा इशारा दिला होता.

याबाबतही बातमी सर्वप्रथम ‘वणी बहुगुणी’ने  प्रकाशित करून वरिष्ठांची झोप उडवली. ज्यामुळे ४ ऑक्टोबर ला संजय आगुलवार या शिक्षकाची भेंडाळा शाळेवर नियुक्ती करण्यात आली. शिक्षक आगुलवार ५ ऑक्टोबरला भेंडाळा शाळेवर रुजू झाले. गावकऱ्यांची मेहनत व वणी बहुगुणी चा पाठपुरावा ज्यामुळे शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली.

गजानन धांडे, मारोती गिरसावळे, विनोद सावरकर, संदीप गोंडे, संतोष पानघाटे, मारोती रोहणे, राकेश लेनगुळे, मंगेश धांडे,अमोल येलादे, किशोर झाडे सह गावकर्यांनी वणी बहुगुणीचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.