नेत्याने मागितली चक्क पोलीस ठाण्यात जाऊन खंडणी

एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

0

सुशील ओझा, झरी:  मुकुटबन पोलीस स्टेशन चे ठाणेदार धनंजय जगदाळे यांना पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन धमकी देऊन खंडणी मागितल्यावरून तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यावरून एका पक्षाच्या राज्याध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीवरून संतोष हणमंतराव कुरमेलवार रा. मुकुटबन इथला रहिवाशी आहे. हा सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचा प्रदेक्षाध्यक्ष असल्याची ओळख देतो. तर गणेश सदाशिव कदम रा सायगाव तालुका जावळी ता सातारा इथला रहिवाशी आहे. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ठाणेदार जगदाळे हे आपले कर्मचा-यांसह हजर होते. दरम्यान मोटर सायकलवरून संतोष कुरमेलवार आणि गणेश कदम हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी ठाणेदार व कर्मचाऱ्याजवळ येऊन त्यांना सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचा प्रदेक्षध्यक्ष असल्याची ओळख सांगत पार्टीला फंड म्हणून पैसे मागितले. तसेच पक्षाचा मुंबई येथे कार्यक्रम असल्याने फंड आवश्यक असल्याचेही बोलला.

ठाणेदार यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. यावर कुरमेलवार याने मुकुटबन परिसरात राजरोषपणे अवैद्य धंदे सुरू आहे त्यांच्याकडून पैसे घेऊन आम्हाला द्या अन्यथा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन करू व त्याचा प्रचार व प्रसार करून तुम्हाला दाखवू अशी धमकी उपस्थित सर्व पोलीस कर्मचाऱ्यासमोर दिली.

गेल्या काही दिवसांपासून कुरमेलवार हा 15 ऑगस्ट निमित्त मदत पाहिजे मी दोन मुलांना पाठवतो असे फोन करून ठाणेदारांना बोलायचा. वेगवेगळ्या नंबर वरून वारंवार फोन करून हा खंडणी मागायचा. त्यावरून शासकीय काम करीत असताना अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

ठाणेदार जगदाळे यांनी सदर बोलण्याचे रेकॉर्डिग व ठाण्यात येऊन वाद घातल्याचे सी सी टीव्ही फुटेज असल्याची माहिती आहे. ठाणेदार जगदाळे यांना पैशाची मागणी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यावरून कलम 385 व 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरा आरोपी हा सातारा जिल्ह्यातला असून त्याला सातारा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष बनविण्याचे आमिष देऊन बोलावण्यात आल्याची माहिती आरोपी कदम याने दिली.

15 ऑगस्टला मुंबई जाण्याकरिता आरोपी गणेश कदम हा स्वतःच्या खर्चाने घेऊन जाणार होता. ज्यामुळे कुरमेलवार याचे सर्व कार्यक्रम फुकटचे होते हे उघड पडले. कुरमेलवारने असाच फंड वनविभाग कार्यालय, शासकीय रुग्णालय, पोलीस स्टेशन व इतर शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी मागितल्याची माहिती मिळाली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचा व्ययक्तिक मिटींग ज्यामध्ये नियुक्त केलेल्या पदाधिकारी यांना नियुक्ती कार्ड वाटप कार्यक्रम असल्याची माहितीही कदम याने दिली. या कार्यक्रम करिता तालुक्यातील शासकीय कार्यालयातून फंडाच्या नावावर वसुली कशासाठी असा प्रश्न सुज्ञ जनता करीत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही दोन ठाणेदाराला त्याने पैशाची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामुळे समाजहिता करिता पार्टीची स्थापना करण्यात आली की शासकीय अधिकाऱ्यांना पैसे मागण्याकरिता पार्टीची स्थापना करण्यात आली असा संतप्त प्रश्नही जनता करीत आहे.

पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना यवतमाळ कारागृहात रवानगी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.