तुरीच्या थकीत रकमेसाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

0

सुशील ओझा, झरी: तालुका युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने १९ मार्च ला दुपारी १२ वाजेपासून तर ३ वाजेपर्यंत मुकुटबन-पाटण मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांचे नाफेड मार्फत २०१८-१९ मध्ये ६६७५ क्विंटल तूर ३ कोटी ६१ लाख रुपयाचे तूर खरेदी करण्यात आली. परंतु एकाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छदामही जमा न झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. शेतक-यांना लवकरात लवकर चुकारा मिळावा यासाठी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

आंदोलनात मोदी सरकार व मुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करून शेतकऱ्याचा तुरीचा पैसा जमा करण्याची हमी द्या अन्यथा आमची तुरी परत करा अशी प्रखर भूमिका रास्ता रोको आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आली. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी फोनद्वारे बोलणी केली. त्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिका-यांनी लेखी आदेश वॉट्सऍप द्वारे पाठवून १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या तुरीचे थकीत पैसे देण्यात येईल असे कळविले. आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. परन्तु १५ दिवसात चुकारे न दिल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

सदर आंदोलनात युवा नेते राजीव कासावार, राजीव एल्टीवार, संदीप बुरेवार, भूमारेड्डी बाजनलावर, पुरुषोत्तम आवारी, रामन्ना एल्टीवार, प्रकाश म्याकलवार, सुनील ढाले, मिथुन सोयाम, संजय भोयर, जानक नाकले, भूमारेड्डी एणपोतुलवार, करम बघेले, अमोल आवारी, राजीव आस्वले, मनोज अडपावार, रुपेश द्यागलवार, नर्सिंग टोंगलवार, बळी पेंदोर, संतोष जंगीलवार, भगवान चुकलवार, शेखर बोनगिरवार, भगवान रजनलवार, गड्डमवर, पैसटवार, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनामुळे पीएसआय नितीन चुलपार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.