झरी तहसील कार्यालयात बोगस अर्जनविसच्या संख्येत वाढ

गोरगरीब जनतेची जास्त पैसे घेऊन लूट

0

सुशील ओझा, झरी:-तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात आदीवासी निरक्षर व अज्ञानी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून झरी येथील शासकीय कामानिमित्त तालुक्यातील जनतेला पंचायत समिती, कृषी कार्यालय, बँक, भूमिअभिलेख, शिक्षण विभाग, व इतर कार्यालयासह तहसील कार्यालयात यावे लागते. अज्ञान व निरक्षर असल्याने जनतेला कोणताही अर्ज असो अथवा कोणतेही कागद लिहता किंवा वाचता येत नसल्याने गरीब जनता तहसील कार्यालयातील आवारात ठिय्या मांडून बसलेल्या अर्जनविस कडे जातात प्रतिज्ञा पत्र , शासकीय अर्ज व इतर कागद काळे करून घेतात. त्या कामाचे अर्जनविसकडून मोठी रक्कम उकळले जात आहे.

नियमाने अधिकृत अर्जनविस याना रोजचा रेकोर्ड ठेवावा लागतो परंतु एक पेन व एक खरड घेऊन येणारे यांच्या जवळ कुठचे रेकोर्ड नाही. गरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत २० व ३० रुपयाच्या कामाचे १५० ते २०० रुपये उकळून जनतेची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे आढळत आहे. ज्यामुळे ह्या बोगस अर्जनविस वर कार्यवाही कोण करेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तहसील कार्यालयाच्या परिसरात ८ ते १० बोगस अर्जनवीस आहेत. विशेष म्हणजे या  तहसील कार्यालयातिल एक अर्जनविस वगळता एकाही अर्जनविसंकडे परवाना नाही ज्यामुळे यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय असो की निमशासकीय कागद लिहण्याचे अधिकार नसताना हे बोगस अर्जनविस सर्रास जनतेकडून अव्वा च्या सव्वा घेऊन जनतेला लुटून गबर बनत आहे. यांच्या लिहिलेल्या कागदावर संपूर्ण शासकीय अधिकारी ही शहानिशा न करता बिनधास्त सह्या करतांना दिसतात. ज्यामुळे पाणी कुठे मुरत आहे कळायला मार्ग नाही. तालुक्यातील प्रत्येक कार्यालयात कोणत्या अर्जाचे किंवा कागदाच्या अर्जाचे किती पैसे द्यावे असे शासनाच्या दराचे फलक लावणे आवश्यक झाले आहे.

या बोगस अर्जनविस बाबत प्रभारी तहसीलदार आर बी खिरेकर यांच्याशी विचारणा केली असता माझ्याकडे कुणीही लेखी तक्रार केल्यास मी कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.