हिरापुर (मांगली) येथील रेती घाटावर महसूल विभागाचा छापा

0

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील हिरापुर (मांगली) येथील रेती घाट क्रमांक 250 हर्रास झाला आहे. मात्र हर्रास घाट सोडून इतर घाटातूनही मोठ्या प्रमाणातून रेतीची तस्करी सुरु आहे . याबाबतची माहिती महसूल विभागाला लागताच तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी यांना आदेश देऊन रेती तस्करी सुरु असलेल्या रेतीघाटाची तपासणीचे करण्याचे आदेश दिले होते. यावरून मंडळ अधिकारी येरावार तलाठी गायकवाड, डेरे, चौधरी व कोतवाल दिनेश मेश्राम हे हिरापूर घाटावर मोका तपासणी करिता गेले असता एक ट्रॅक्टर रेती भरलेला व तीन ट्रॅक्टर रेती भरण्याकरिता उभे असलेले आढळून आले. तसेच रेती उत्खनणाकरीता पोकलॅन्ड (जेसिबी) झाडाझुडपात लपवून ठेवल्याचे आढळून आले. हर्रास झालेल्या रेती घाट क्रमांक २५० व्यतिरिक्त दुसऱ्या गट नंबर मधून रेती उत्खनन करीत असल्याचे आढळून आले. तर इतरत्र गटातून उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप, लांबी, रुंदी व खोली, मोजणी हजर कर्मचारी कडून करण्यात आली. या जागेवरून ३६०८. ७६चौरस मीटर जागेमध्ये अवैध रेती उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आले.

सदर पोकलॅन्ड (जेसीबी) नेर येथील ठेकेदार राजू सवालाखे यांचे असून अवैध रित्या उत्खनन व वाहतुकी करीता घाटावल आलेले आढळले. तर चार ट्रॅक्टर अवैधरित्या रेती वाहतूक व तस्करी करिता वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. असा अहवाल तहसीलदार यांना देण्यात आला. जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर सताधारी पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा असून रेती तस्करीला याच लोकांचे पाठबळ असल्याचे आढळून येत आहे. जप्त करण्यात आलेले ट्रॅकटर मालक सुरेश मानकर, रा. मांगली, श्रीकांत चामाटे रा मांगली, सूर्यकांत मिलमीले रा पवनार, प्रशांत बोलीवार रा. टाकळी यांचे असल्याचा अहवाल मंडळ अधिकारी अविनाश येरावार यांनी तहसीलदार गणेश राऊत यांना दिला आहे.

चारही ट्रॅक्टर मंगली गावापर्यंत आणून पंचनामा करून सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे तहसीलदार गणेश राऊत ही कार्यवाही करण्याकरिता अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर ह्याच घाटावर जाण्याकरिता झरी कार्यालयातून निघाले. घाटाजवळ पर्यंत येऊन परत झरी कार्यालयात गेल्याने संशय व्यक्त केल्या जात आहे. ही कार्यवाही तहसीलदार यांनी न करता कर्मचार्यांनी केल्यामुळे प्रजाला सोडून राजा का गेला असा प्रश्न कर्मचारी करत आहे.

रेती हर्रास झालेल्या ठेकेदाराने पैनगंगा नदीतील पार फोडून नदीतील मातीचा वापर कडून 2 किमी पर्यंतचा रस्ता नदीच्या पात्रातून अवैध रित्या रेती तस्करी करिता बनविला आहे. ज्यामुळे पाण्याचे स्तोत्र वेगळ्या मार्गाने वळल्याचे दिसत आहे. रेती उत्खननाकरीता मजुरा ऐवजी पोकल्यान्ड (जेसिबी) चा वापर करून हर्रास झालेल्या घाटा ऐवजी दुसऱ्या गट नंबर मधून रेती तस्करी सुरु आहे. याबाबचाही अहवाल मंडळ अधिकाऱ्याने देऊनही अजून पर्यंत तहसीलदार यांनी कोणतीही कार्यवाही पोकल्यान्ड पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयात न लावता त्याच ठिकाणी ठेवण्यात ज्यामुळे या पोकल्यान्डने अजूनही रेती चे उत्खनन सुरु आहे. उलट ट्रॅक्टरद्वारे आणखी रेती तस्करी सुरूच आहे.

नियमाने पोकलॅन्ड (जेसीबीने) रेती उत्खनन करता येत नाही. असे आढळल्यास ३ लाखांचा दंड व पोकलॅन्ड मालका विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही सदर रेती घाट ठेकेदारावर व रेती चोरी करनार्यांवर गौणखनिज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांनाच वाचविण्याचा प्रयत्न महसूल विभाग करीत असल्याचे दिसत आहे.

२५ जानेवारीला रेती घाटावर पंचनामा करून संपूर्ण माहितीचा अहवाल देऊनही कोणतीही कार्यवाही न करता अजूनही पोकलॅन्ड (जेसिबी) पैनगंगे च्या तिरावर असून अजूनही रेतीचे उत्खनन सुरूच आहे. रेती तस्करी व रेती चोरीकरिता सत्ताधारी राजकारणी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे प्रमाण जास्त झरी तालुक्यात दिसत असून यांच्यावर लगाम कोण लावेल असा प्रश्न उपस्थितीत होत आहे,. रेती तस्करी करिता सर्वात जास्त राजकारणी लोकांची धडपड असून रेती तस्करीला त्यांचेच पाठबळ पाहायला मिळत आहे. अवैध रेती तस्करी करणारे व त्यांना पाठबळ देणार्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे.

जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार तालुक्यातील सर्व नदी नाले रेती पात्रातुन यांत्रिक साधनांचा जेसीबी व तत्सम वाहनांनी प्रवेश करुन रेती, वाळूचे अवैध उत्खनन, वाहतूक करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले असुन तसे आदेश जारी केले आहे. परंतु ह्या आदेशाची अमलबजावणी होताना दिसुन येत नाही.

याबाबत तहसीलदार गणेश राउत यांच्याशी वणी बहुगुणीने विचारले असता ते म्हणाले की तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकारी आले व कोतवाल यांच्या मुलाखती असल्याने मला बोलावण्यात आल्याने मी कार्यल्यात परत गेलो. तसेच ट्रॅक्टर व पोकल्यान्ड जप्त केल्यावर कार्यवाहीचा अधिकार मंडळ अधिकाऱ्याला असतो त्यांनी ती कार्यवाही करायला पाहिजे – तहसीलदार झरी गणेश राऊत.

तर याबाबत मंडळ अधिकारी अविनाश येरावार म्हणाले की तहसीलदार यांनी घाट तपासणीचे आदेश दिल्यावरून मी, तलाठी व कोतवाल घेऊन घाटावर जाऊन मौका पाहणी करून चार ट्रॅकटर व पोकल्यान्ड हे अवैद्यरित्या उत्खनन व वाहतुकी करीत उभे असलेले आढळले. त्यांचा जप्तीनामा बनविला तसेच हर्रास घाटा व्यतिरिक्त उत्खनन केलेल्या जागेची मोजणी करून पंचनामा व अहवाल तयार करून कार्यवाहीसाठी तहसीलदार याचे कडे पाठवून मी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले- अविनाश येरावार मंडळ अधिकारी.

Leave A Reply

Your email address will not be published.