महिलांनो सावधान…! नोकरीसह राहणे खाणे फुकट जाहिरातीतून फसवणूक

बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन महिलांना अटक

0

विवेक तोटेवार, वणी: आंध्रप्रदेशातील दोन युवतींना नोकरीचे आमिष दाखवून बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी वणी पोलिसांनी ही कार्यवाही केली. या दोन्ही मुली उच्चशिक्षीत आहेत. नोकरीसह राहणे खाणे फुकट अशा जाहिरातीला या मुली बळी पडल्या. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेश्याव्यवसायाच्या दलदलीत जाण्यापासून वाचल्या.

सारिका (बदललेले नाव) ही आंध्रप्रदेशातील रहिवासी आहे. सारीक ही बी ए प्रथम वर्गात शिक्षण घेणारी होतकरू विद्यार्थीनी आहे. तिच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे घरी आर्थिक मदत होईल या उद्देशाने ती गेल्या काही दिवसांपासून नोकारीच्या शोधात होती. यातच तिने 28 जानेवारीला इनाडू नामक पेपरात जाहिरात पाहिली. ‘नागपूर येथे युवतींसाठी नोकरी तसेच राहणे खाणे मोफत. पगार 15 हजार रुपये महिना’ सारिकाने ही जाहिरात बघताच त्या ठिकाणी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. तिच्यासोबत एक महिला बोलली. तिने सारिकाला पूर्ण विश्वासात घेतले. सारिकाच्या आईसोबतही तिने बोलणं करून त्यांचा विश्वास जिंकला.

महिलेने एक तारखेपासून रुजू व्हायला सांगितल्याने सारिकाने 31 जानेवारीला जाण्याचे ठरले. तिने आपल्या सोबत तिच्या बहिणीलाही घेतले. ठरल्याप्रमाणे त्या दोन्ही महिला सारिका व तिच्या बहिणीला घेण्यासाठी सामालाकोटा येथील रेल्वे स्थानकावर आल्या. सायंकाळी 5.20 च्या रेल्वेने त्या मृगणे निघाल्या व सकाळी 7.50 ला वणी येथे पोहचल्या. या ठिकणी यांना घेण्यासाठी एक चारचाकी वाहन आले. त्या वाहनात बसून सारिका तिची बहीण व त्या दोन महिला आशा चारही जणी वणीच्या गावाबाहेर एका ठिकाणी पोहचल्या.

त्या महिलांच्या सांगण्यावरून ते त्याचे घर होते. सारिकाने कामाबाबत विचारणा केली परंतु त्या दोनही महिला काही सांगण्यास तयार नव्हत्या. अखेर सारिकाने त्यांना वारंवार विचारणा केली असता त्यांना देहव्यापार करावा लागेल असे सांगण्यात आले. तसेच या धंद्यात खूप पैसे असल्याचेही तिने सांगितले. सारिका व तिच्या बहिणीला हे ऐकून धक्का बसला. पुढे त्या दोघींनीही युक्ती लढवून त्या ठिकाणाहून पळ काढला. वाटेत त्यांना भेटलेल्या लोकांच्या मदतीने त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठले.

पोलिसांनी सारिकाची तक्रार दाखल करून सदर दोन्ही महिलांवर कलम 370, 420 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी दोन्ही महिलांना अटक केल्याची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि योगेश हिवसे करीत आहे

.

Leave A Reply

Your email address will not be published.