जन चेतना समितीतर्फे वणीत चर्चासत्र संपन्न

फुले-आंबेडकर जयंती समारोह चर्चासत्रे घेऊन साजरी

0 201

महेश लिपटे (वणी): वणी उपविभागामध्ये जन चेतना समिती तर्फे फुले आंबेडकर जयंती निमित्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान केसुर्ली, साखरा(दरा), अडेगाव, पुरड(नेरड) येथे विविध शैक्षणिक विषयावर चर्चासत्रे घेण्यात आले. या विषयावर सन्मानणीय वक्त्यांनी मार्गदर्शन केले. याचा समारोपीय कार्यक्रम वणीतील शासकीय जि.प. विद्यालयाच्या प्रांगणात झाला.

समारोपीय चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जन चेतना समितीचे संयोजक विजय वानखेडे, वणी हे होते. त्यांनी शिक्षण संदर्भात आंदोलनाचे स्वरूप व दिशा या विषयावर अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे वक्ते प्रा. प्रभाकर गायकवाड,औरंगाबाद यांनी शिक्षणातील प्रश्न आणि लढाई या विषयावर भाषण केले. मा.प्रा.श्रीकांत काळोखे,अहमदनगर यांनी खासगी व्यवस्थेतला आशय,व्यवहार आणि पिढ्यांच्या जडण घडणीवर होणारे परिणाम या विषयावर भाषण केले. प्रा. रमेश बिजेकर, नागपूर यांनी स्वातंत्रोत्तर शिक्षणाची वाटचाल दशा आणि दिशा या विषयावर भाषण करून उपस्थितांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. समारोपीय चर्चासत्र कार्यक्रमाचे संचालन संजय पेचे यांनी केले. तर आभार प्रदर्शन महेश लिपटे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन चेतना समितीचे भाऊसाहेब आसुटकर,रुषीकांत पेचे, मोहन हरडे, संजय चिंचोलकर, कैलास बोबडे, बंटी तामगाडगे, विलासराव शेरकी, अजय धोबे, अभय पानघाटे, अमोल टोंगे, रघुनाथ कांढारकर, किसन कोरडे, हेमंत वाघमारे, संतोष तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

25 मार्च अंतिम तारीख

Comments
Loading...