कायर येथील विवेकानंद विद्यालयात महापरिनिर्वाण दिन

0 320

बहुगुणी डेस्क, कायर : कायर येथील विवेकानंद विद्यालयात महापरिनिर्वाण दिनाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक अविनाश ठाकरे हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव व शारीरिक शिक्षक सतीश घुले, विशेष मार्गदर्शक अभ्यासक विचारवंत प्रा संजय तेलंग, सह शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंलावार, योगेश सातेकर, हे उपस्थित होते.

या प्रसंगी विचार व्यक्त करतांना प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय तेलंग म्हणाले की, जगाच्या पाठीवर एकमेव विद्वान असतील तर डॉ बाबासाहेब आंबेडकराशिवाय दुसरे कोणीच असू शकत नाही. तेव्हा बाबसाहेबांकडे विद्यार्थी म्हणून पाहिलं पाहिजे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेन्द्र इखारे यांनी केले .तर आभार सोनाली भोयर यांनी मानले .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आकाश बोरूले, दिलीप कांदसवार, मधुकर कोडपे, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

mirchi
Comments
Loading...