दारू तस्करीला पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे पाठबळ !

तस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी, नव्या ठाणेदारांपुढे आव्हान

0 493

सुशील ओझा, झरी: चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारू तस्करी व अवैध धंद्यांना लगाम लावण्यात पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची क्षमता अपुरी पडली आहे. अवैध व्यवसायाला एकप्रकारे अप्रत्यक्ष या दोन्ही विभागाचे पाठबळ लाभत आहे. आता नव्या ठाणेदारांपुढे हे अवैध व्यवसाय बंद करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव व घोन्सा येथे खुलेआम अवैध दारू विक्री व जुगार सुरू आहे. मुकुटबन येथे पहाटे ५ ते ७ वाजेपयंर्त दारू विक्री सुरू राहते. मोबाइलवर जुगार घेण्याच्या फंड्याची माहिती पोलीस दलाला असताना हा विभाग झोपेचे सोंग घेऊन आहे. गावाच्या मध्यवस्तीतील व गावाबाहेरील बीयर बार मधून इंग्लिश दारू दररोज चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर, कोरपना, अडेगाव, पुरड, कायर आदी भागात वाहनाने पोहोचविली जाते.

सदर दारूपुरवठा मांगली व मुकुटबन येथून घोन्सा मार्गे होतो. खडकी, गणेशपूर, वेळाबाई मार्गे कोरपना व गडचांदूर तसेच येडसीवरून खातेरा ते पार्डी मार्ग चंद्रपूर जिल्ह्यात दारू पोहोचविली जाते. चारचाकीने गणेशपूर येथील एका घरात दारूचा साठासुद्धा करून रात्रंदिवस दारू पुरवठा केला जात आहे..

घोन्सा येथे नदीच्या पात्रात व बसस्टॅण्डवर लहान मुलाच्या हस्ते दारू विक्री केली जाते. यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला महिन्याकाठी चिरीमिरीही दिली जात असल्याची चर्चा आहे. जिल्हा पातळीवरील एलसीबी व वणी उपविभागात एसडीपीओचे पथक कारवाईत कुचकामी ठरली आहे. चुटपूट कारवाई करण्यातच धन्यता मानली जात आहे.

अडेगावात १० ते २० अवैधरित्या पवे विकणारे आहेत. त्यातील एकाला पोलिसांनी अधिकृत परवानगी दिल्याची चर्चा आहे. या दारूविक्रेत्या संदर्भात माहिती असूनही कारवाई केली जात नाही, हे विशेष. दुचाकी व चारचाकीने दारू तस्करीवरही कारवाई करण्याचे धाडस पोलीसाकडून होत नाही. नव्याने रुजू झालेले ठाणेदार सोनुने या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ आहे.

mirchi
Comments
Loading...