मुलीच्या आत्महत्येपाठोपाठ वडिलांचाही विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न

मार्डी आत्महत्या प्रकरण: सकाळी मुलीने 9 महिन्याच्या बाळासह घेतला होता गळफास...

भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या विरहात मानसिक तणावात जीवन जगत असलेल्या मार्डी येथील रोशनी आशिष झाडे या विधवा महिलेने 9 महिन्याच्या बाळासह गळफास घेतला होता. यात रोशनीचा मृत्यू झाला होता मात्र फास सैल झाल्याने चिमुकली यातून बचावली होती. दरम्यान मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दुपारी रोशनीचे वडील यांनी देखील विषारी द्रव्य प्राषन केले. त्यांच्यावर सध्या मारेगाव येथे उपचार सुरू आहे. 

मृतक रोशनी आशिष झाडे (वय अंदाजे 24) हिचे काही वर्षांपूर्वी हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता. यांच्या या संसाररूपी वेलीवर एक कन्यारत्न सुद्धा जन्माला आले. असाच यांचा सुखाने संसार सुरु असताना मागील दोन महिन्यापूर्वी आशिष झाडे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ती मार्डी येथे माहेरी आली होती. आपल्या 9 महिन्यांच्या मुलीसह ती वडिलांकडे राहत होती.

पतीच्या निधनानंतर रोशनी ही सतत मानसिक तणावात असायची. आता आपण मुलीचा सांभाळ कसा करायचा अशा विवंचनेत असलेल्या रोशनीने आज मंगळवारी दिनांक 7 जून रोजी सकाळी साडे 6 ते 7 वाजताच्या दरम्यान मार्डी येथील वडिलांच्या घरी चिमुकलीसह पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. मात्र फास सैल झाल्याने यात बाळाचा जीव वाचला.

रोशनीचे वडील जीवन वैद्य (वय अंदाजे 53) हे ऑटो चालक आहेत. मार्डी ते चिंचमंडळ रोडवर त्यांचा ऑटो चालतो. सकाळी ते घरून कामासाठी गेल्यानंतर त्यांना मुलीने नातीसह गळफास घेतला होता. मुलीच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. दुपारी 2 वाजताच्या सुमारास ते ऑटोने मार्डी-कुंभा रोडवरील सिंधी गावाजवळ गेले होते. एका ठिकाणी थांबून त्यांनी तिथे विषारी द्रव्य प्राशन केले.

दरम्यान सिंधी गावातील काही नागरिकांना जीवन हे एका ठिकाणी बसलेले आढळले. गावक-यांना जीवन यांच्या मुलीच्या आत्महत्येची वार्ता कळाली होती. ते तिथे गेले असता त्यांना जीवन यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे कळले. गावातील लोकांनी तातडीने त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

महिलेचा 9 महिन्याच्या बाळासह आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

Comments are closed.