नगर परिषद शाळा क्र 8 मध्ये पालक मेळावा

0

देवेंद्र खरवडे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च शाळा क्र 8 येथे दि. 10 मार्च 2018 ला पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शिक्षण सभापती आरती वांढरे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापक बंडू कांबळे यांनी पालकांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती दिली.

याप्रसंगी शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. प्राथमिक
गटात अव्वल स्थान सोनू देठे तर उच्च प्राथमिक गटात अव्वल स्थान ओम नागपुरेने मिळविले. हिमांशू गेडाम, प्रज्वल बोरुले, वैशाली गायकवाड, नंदिनी सिडाम, वैष्णवी मेश्राम या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले.

पालक व शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी चर्चा झाली, पालक मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षिका चित्रा बावणे, किशोर चौधरी, सुभाष पोटदुखे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.