पाटण येथे खासदार-आमदार चषक क्रिकेट सामने

0 94
सुशील ओझा, झरी : तालुक्यातील पाटण येथे युवा क्रिकेट क्लब व ग्रामवासीद्वारा आयोजित खासदार-आमदार चषक क्रिकेट सामने पार पडले. शहरी व ग्रामीण अशा दोन गटात सामने खेळविण्यात आले.

क्रिकेट सामन्यामध्ये शहरी गटात प्रथम बक्षीस एक लाख रुपये विदर्भ एलेवन संघ वर्धा, दुसरे बक्षीस ५० हजार गब्बर संघ अकोला, तिसरे भाग्योदय संघ अकोला तर ग्रामीण गटात प्रथम युवा क्रिकेट क्लब संघ पाटण व दुसरे बक्षीस गणेशपूर, तिसरे बक्षीस ताडउमरी, शहरी संघात मॅन ऑफ दी मॅच अकोला संघातील खेळाडू फहीम याला देण्यात आले..

ग्रामीण गटामध्ये मॅन आफ दी सिरीज पाटण येथील राकेश आईटवार, मॅन आफ दी मॅच गौरव मिटपेल्लीवार यांना देण्यात आले. बक्षीस वितरण आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, पं. स. सदस्स राजेश्वर गोन्ड्रावार, सरपंच रमेश हलालवार, ठाणेदार अमोल बारापत्रे, दिनकर पावडे, अशोक बोदकुरवार, राम आईटवार, सुरेश मानकर, सतीश नाकले, सतीश दासरवार, जगदीश येनगुवार, मुख्याध्यापक लक्षट्टीवार, ज्योती मिटपेल्लीवार, प्रभाकर कामनवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन अनिल चितकुंटवार यांनी केले.

सामने यशस्वी करण्याकरिता सामन्याचे आयोजक तथा युवा क्रिकेट क्लब पाटणचे अध्यक्ष शेख अमजद उपाध्यक्ष आकाश पुप्पलवार, सचिव राकेश आईटवार, कोषाध्यक्ष महेश कत्तुरवार, सदस्य राजू द्यावतीर्वार, गौरव मिटपेल्लीवार, अनिल पोर्जलवार, संपर्कप्रमुख श्रावण नोमुलवार, भगवान बोनगीरवार, प्रकाश बेरेवार, शेख मुजीम, राजेश कर्णेवार, गजानन मुत्यालवार, महेश भुतमवार, दिनेश कोटवार, अशोक पोर्जलवार, संदीप मुत्यालवार यांनी परिश्रम घेतले..

mirchi
Comments
Loading...