धक्कादायक…! दिवसाढवळ्या कुमारीकेला फरपटत नेऊन अत्याचार

दोन अज्ञात दुचाकीस्वारांचे कृत्य.. घटनेने हादरला परिसर

भास्कर राऊत, मारेगाव: शेत शिवारात शौचास गेलेल्या  एका 17 वर्षीय कुमारीला दोन अज्ञात तरुणांनी फरपटत नेले व तिच्यावर अत्याचार केला. तालुक्यातील कुंभ्या जवळील एका शेतशिवारात दुपारी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून या दोन नराधमांचा शोध मारेगाव पोलीस घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार कुमारीका (17) ही दुपारी 12 वाजताच्या सुमारास कुंभा जवळील एका शेतात शौचास गेली होती. दरम्यान एक दुचाकीस्वार आणि त्याचा साथीदार जवळच उपस्थित होते. त्यांना कुमारीका निर्जन ठिकाणी शौचास गेल्याचे आढळले. त्यातील एकाची नियत फिरली व ते दोघेही कुमारीकेच्या दिशेने शेतात गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दोघे तिथे पोहोचताच तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांनी तिला फरपटत एका आडोशाला नेले. एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला तर दुसरा काही ठिकाणावर थांबून ‘वॉचिंग’ करीत होता. काही वेळाने ते दोघेही नराधम तिथून दुचाकी घेऊन वडकीच्या दिशेने निघून गेले.

कुमारीका घरी गेली व तिने सर्व आपबिती तिच्या आईवडिलांना सांगितली. या घटनेने तिचे पालक हादरून गेले. तिच्या आईवडिलांनी मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तातडीने कामाला लागले. सध्या पोलीस आरोपीच्या मागावर असून ते राळेगाव तालुक्यात गेले असल्याची माहिती आहे. भर दिवसा एका कुमारिकेला फरपटत नेऊन अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

(अधिक माहिती येताच ही बातमी अपडेट केली जाईल.)

हे देखील वाचा:

http://www.bolbhidu.com/guddalpendi-a-game-played-at-wani-on-the-auspicious-day-of-dhuliwandan/

Comments are closed.