रोटरी क्लब उत्सवात सिलिंडर फुटला, दोन चिमुकले जखमी

0

वणी (रवि ढुमणे): वणी शहरात सुरू असलेल्या रोटरी क्लबच्या जत्रेत फुग्यात हवा भरण्याचा सिलिंडर चा स्फोट होऊन दोन चिमुकले जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.

वणी शहरात गेल्या काही वर्षांपासून रोटरी क्लबने मिनी बाजार भरवायला सुरुवात केली आहे. या बाजारात परप्रांतीय व्यावसाईक व्यसवाय करण्यासाठी आलेले आहेत. यातीलच फुग्यात हवा भरणाऱ्या व्यावसायिकांच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन बालके जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात्रा भरविली खरी मात्र तेथे येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेने ऐरणीवर आला आहे.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बरेच पालक मुलांना घेऊन जत्रेत सहभागी झाले होते. प्रसंगी जयप्रकाश सूर्यवंशी हे 7 वर्षीय मुलगी आचल व 2 वर्षीय मुलगा अक्षय याला घेऊन रोटरी उत्सवात सहभागी झाले होते. दरम्यान जयप्रकाश हे दोघांना फुगे घेऊन देण्यासाठी फुगेवाल्या जवळ आले. आचल व अक्षय जवळच उभे होते. तितक्यात फुग्यात हवा भरण्याच्या सिलिंडरचा स्फोट झाला. यात अक्षय जखमी झाला तर आचल ला किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सिलिंडर चा स्फोट होऊन दोघे बालके जखमी झाल्याने रोटरी उत्सवातील सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. सदर घटनेची तक्रार देण्यासाठी सूर्यवंशी पोलीस ठाण्यात गेले आहे. तूर्तास वृत्त लिहिपर्यंत या घटनेची माहिती घेणे सुरू असल्याची माहिती आहे.

गेल्या काही वर्षांपासून रोटरी क्लबने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रोटरी उत्सव सुरू केला आहे. या उत्सवात व्यावसायिक मोठ्या प्रमाणात येतात. आकाश पाळणा, मौत का कुवा,आधुनिक उपकरणांचे स्टॉल आदी व्यावसायिकांकडून रोटरी क्लब भाडे घेतात. या जत्रेला पूर्णतः व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या उत्सवात लेकरांची मौज व त्यांचे समाधान करण्यासाठी पुरुष महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे. मात्र जत्रेत येणाऱ्या लोकांची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.