विज्ञान प्रदर्शनीत गुरुकुल शाळेतील दोन विद्यार्थी प्रथम

0

सुशिल ओझा, झरी: पंचायत समितीच्या वतीने मार्की येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2018-2019 चे आयोजन दि.11 व 12 डिसेंबरला अनु. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ,मार्किं (बु ) येथे करण्यात आले .या प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला. यात प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट तयार करण्यात आले होते . माध्यमिक गटामधून गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथील वसुधा वराटे व एजल पुनवटकर या विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक पटकाविला.

या विद्यार्थीनींनी आपल्या यशाचे श्रेय विज्ञान विषयशिक्षक विकास वाढई तसेच मुख्याध्यापक सुभाष गजभिये यांना दिले .

Leave A Reply

Your email address will not be published.