शिरपूरच्या ‘त्या’ मामाभाच्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

0 3,517

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिरपूर ते शिंदोला मार्गावर कुर्ली जवळ (दि.५) बुधवारी दोन दुचाकींची धडक होऊन अपघात घडला होता. या अपघातात शिरपूर येथील विजय कामतवार वय ४५ आणि राकेश पारशिवे वय ३० हे दोघे गंभीर जखमी झाले होते. तर आबईच्या साई जिनिंग मधील दोघे कामगार किरकोळ जखमी झाले होते.

गंभीर जखमी विजय आणि राकेश यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. दोघेही नात्याने मामेभाचे होते. राकेशचा गुरुवारी तर विजयचा आज दि.९ रविवारी मृत्यू झाला. विजय कामतवार हा मूळचा भद्रावतीचा तर राकेश हा चंद्रपूरचा रहिवासी होता.

विजय हा मजुरीच्या निमित्ताने शिरपूर येथे नातेवाईकांच्या आश्रयाने राहायला आला होता. तर राकेशला आई वडील नसल्याने तोही मामाकडे राहायला आला होता. विजयच्या मागे पत्नी, मुलगी असा परिवार आहे. तर राकेश हा अविवाहित होता. अत्यंत गरीब कुटुंबातील कमावत्या माणसांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...