कुटुंबाचा आधार असलेल्या एकुलता एक मुलाची आत्महत्या 

"या" कारणामुळे प्राशन केले होते विष 

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे एका अविवाहित तरूणांनी रविवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न  केला होता. आज मंगळवारी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आशीष सुरेश कातकडे (26) रा. चिखलगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. आई वडिलांना एकुलता एक असलेल्या कर्त्याधर्त्या मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

प्राप्त माहितीनुसार मृतक आशीष कातकडे हा चिखलगाव ग्रामपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठाचे कामे करायचे. नुकतेच काही महिन्यापूर्वी त्यांनी फाइनन्सवर नवीन ट्रॅक्टर घेतला होता. कर्जावर घेतलेल्या ट्रॅक्टरचे हप्ते वेळेवर फेडता न आल्यामुळे आशीष काही दिवसापासून चिंतेत होता. काही नातेवाईकांकडूनही त्यांनी पैसे घेतले होते. रविवार 17 एप्रिल रोजी घरच्या लोकांची नजर चुकवून आशीषने मीरा-71 तणनाशक प्राशन केले. सायंकाळी जेवण केल्यानंतर आशीषला उलट्या झाल्या. तेव्हा कुटुंबियानी लगेच उपचारासाठी नागपूर येथे नेले. मात्र खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

इंदिरा सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे यांचा पुतण्या असलेला आशीष हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर व आर्थिक चणचणमुळे आशीष यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. त्याच्या मागे आई वडील व अविवाहित मोठी बहीण आहे.

Comments are closed.