ईद निमित्त मुस्लिम बांधवांचा सत्कार

0

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन व गावकऱ्याच्या वतीने ईदनिमित्त मुस्लिम बांधवांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. ईद निमित्त मुस्लिम बांधव दर्गा (इदगा) येथे नमाज करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला.

मुस्लिम बांधवांचे स्वागत ठाणेदार शिवाजी लष्करे, पोलीस उपनिरीक्षक प्रफुल डाउले, सरपंच रमेश हललवार, उपसरपंच प्रवीण नोमुलवार, सामाजिक कार्यकर्ते राम आईटवार, मजिदचे मौलाना, राजू येलटीवार, मोहम्मद युसूफ शेख हुसेन, बाबू मास्तर, शेख हसन, अमजद शेख गफार, डॉ. शेख बबन, अमोल अनेरवार, ज्ञानेश्वर सोयाम, मोहम्मद इरफान, राहुल राठोड, नरेश काडपेल्लीवार, नंदू कुंटलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील हिंदू मुस्लिम समाजाचे अनेक लोक उपस्थित होते..

एक महिना उपवास करून अखेरच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद साजरी करण्यात येते. या दिवशी हिंदू-मुस्लिम बांधवाना ‘शिरखुरमा’ देऊन तोंड गोड केले जाते. आजही परिसरात हिंदू मुस्लीम एकत्र ईद साजरी करताना दिसतात. ज्यामुळे हिंदू मुस्लिम एक असल्याचे दिसून येत.

Leave A Reply

Your email address will not be published.